घरमनोरंजनहंगामा 2' चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना सुटले हसू

हंगामा 2′ चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना सुटले हसू

Subscribe

हंगामा 2 सिनेमात परेश रावल ( Paresh Rawal) आपल्या कन्फ्यूजनमुळे लोकांमध्ये जोरदार गोधळ निर्माण करताना दिसणार आहे.

 

कोरोना व्हायरसमुळे चित्रपटसृष्टीवर गेले काही महिन्यांपासून शोककळा पसरली होती. जस-जसा कोरोनाचा कहर ओसरताना दिसत आहे. तशी चित्रपट सृष्टीदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे. नुकतच लोकांना खळखळून हसवण्यासाठी एक जबरदस्त कॉमेडी सिनेमा (Comady Film) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  2003 साली आलेला ‘हंगामा’ या सिनेमाचा  सीक्वल ‘हंगामा 2’ (Hungama 2), 23 जुलैला रिलीज होणार आहे.तसेच चित्रपटाच्या रिलीज पुर्वीच सिनेमाच्या ट्रेलरने लोकांना हसवून-हसवून लोट पोट करण्यास सुरूवात केली आहे. (Hungama 2 Trailer out) सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉमवर सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. फिल्म ‘हंगामा-2’ डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) वर रिलीज करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचे सावट अद्याप कायम असल्यामुळे प्रेक्षकांची सुरक्षितता लक्षात घेत सिनेमाच्या मेकर्सने ओटीटी प्लॅटफॉमवर सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेताला आहे.

- Advertisement -

ट्रेलर पाहा-

हंगामा 2 सिनेमात परेश रावल ( Paresh Rawal) आपल्या कन्फ्यूजनमुळे लोकांमध्ये जोरदार गोधळ निर्माण करताना दिसणार आहे. तसेच सिनेमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, प्रनिता, मिजान जाफरी, राजपाल यादव यांची मुख्य भूमिका असणार आहेत. हंगामा 2 चे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. या सिनेमातून अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा  कमबॅक करणार आहे. शिल्पाचा शेवटचा ‘अपने’ हा सिनेमा 2007  रिलीज झाला होता. तसेच या सिनेमात अक्षय खन्ना याचा स्पेशल कॅमियो  ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे.एक मुलगी लहान मुलीली घेऊन येत असते  आणि मिजानवर आरोप करते की हे मुलं त्याचे आहे.यानंतर सिनेमात संपुर्ण गोंधळ निर्माण होतो. इतकेच नाही तर अभिनेता परेश रावल यांना सतत वाटत असते की त्यांच्या पत्नीचे अफेयर चालू आहे. हंगामा सिनेमा प्रमाणेच या सेकेंड पार्टमध्ये  कही सीन दाखवण्यात आले आहे.



हे हि वाचा – रणवीरच्या अतरंगी स्टाईलवर होताहेत भन्नाट मीम व्हायरल

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -