घरमनोरंजनमी पाकिस्तानचं खरं रूप जगासमोर आणणार, अदनान सामीची पोस्ट चर्चेत

मी पाकिस्तानचं खरं रूप जगासमोर आणणार, अदनान सामीची पोस्ट चर्चेत

Subscribe

2016 मध्ये पाकिस्तानची नागरिकता सोडून भारतीय नागरिक झालेला सुप्रसिद्ध गायक अदनान सामीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पाकिस्तानबाबत नुकतीच एक धक्कादायक माहिती शेअर केली आहे. अदनान सामीने आपल्या आधीच्या देशाच्या संस्थानेची निंदा केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट एक पोस्ट शेअर करत लिहिलंय की, “अनेक लोकांनी मला विचारलं की,पाकिस्तान बद्दल मी का नाराज आहे. कटू सत्य असं आहे की, पाकिस्तानमधील त्या लोकांबद्दल माझ्या मनात कोणतीच नाराजी नाही. ज्यांनी माझ्यासोबत चांगलं केलं. मी त्यांच्यावर नेहमीच प्रेम करतो जे माझ्यावर प्रेम करतात.”

तसेच पुढे त्याने पाकिस्तानाच्या स्थापनेबाबत लिहिलं की, “पाकिस्तानमध्ये नेहमी सेनेला संस्थान म्हटलं जातं. परंतु मला या संस्थानाची तक्रार आहे. जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना माहिती असेल की या संस्थानाने माझ्यासोबत काय केलं आहे…ज्यामुळे मी पाकिस्तान सोडलं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ADNAN SAMI (@adnansamiworld)

- Advertisement -

पुढे अदनान सामीने लिहिलंय की, “एक दिवस लवकरच मी ते सत्य जगासमोर आणणार आहे. ते माझ्यासोबत कसे वागले आहेत. हे अनेकांना माहित नाही. सामान्य माणसाला या गोष्टीचा अंदाज नाही. यामुळे अनेक लोक आश्चर्यचकित होतील! मी याबाबत अनेक वर्षांपासून गप्प आहे, परंतु आता मी वेळ आल्यावर सर्व सांगणार.”

दरम्यान, अदनान सामीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. याआधी देखील अदनान सामी जुलैमध्ये एक पोस्ट डिलीट केल्यामुळे चर्चेत आला होता.

- Advertisement -

 


हेही वाचा :

करिअरच्या सुरुवातीला एका निर्मात्यांनी माझ्या अंगावर कुत्रे सोडले…रणवीर सांगितला कटू अनुभव

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -