घरमनोरंजन'मी तिला कधीचं आई म्हणणार नाही', करिनासोबत असलेल्या नात्याचा साराने केला खुलासा

‘मी तिला कधीचं आई म्हणणार नाही’, करिनासोबत असलेल्या नात्याचा साराने केला खुलासा

Subscribe

आम्हाला असं काही वाटलंच नाही की आम्ही करिनाला आई म्हणून हाक मारावी.

बॉलिवूड अभिनेता सैफ आली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह हे दोघे २००४ मध्ये वेगळे झाले होते. यानंतर सैफने बॉलिवूडची बेबो करिना कपूर हिच्याशी लग्न केले होते. त्यांची जोडी ही चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली. सैफ आणि करिनाचे लग्न झाले त्यावेळी सैफला दोन मुलं होती. त्यामुळे करिनासाठी सैफच्या मुलांसोबत नवं नातं जोडणं खूप महत्त्वाचं होतं. आपल्या सावत्र आईसोबत सारा मैत्रीचं नातं असल्याचं सांगते. परंतु, असं असूनही सारा करिनाला कधीही आई म्हणून हाक मारत नाही. एका मुलाखतीदरम्यान साराने या गोष्टीचा खुलासा केला होता. मुलाखतीदरम्यान साराला सैफच्या समोर प्रश्न विचारण्यात आला की, ती करिनाला कोणत्या नावाने हाक मारते? ती करिनाला छोटी आई, आई, मम्मी यापैकी काय म्हणते? यावर बिनधास्तपपणे उत्तर देत साराने म्हटलं होतं, ‘माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीही करिना आमची दुसरी आई आहे असा दबाव टाकला नाही. ज्यामुळे आम्हाला असं काही वाटलंच नाही की आम्ही करिनाला आई म्हणून हाक मारावी. यामुळे आणखी एक झालं की करिनाला देखील असं कधीच वाटलं नाही की तिने आईप्रमाणे आमची काळजी घेतली पाहिजे. मी करिनाला के नाहीतर करिना म्हणून हाक मारते.

- Advertisement -

‘पुढे सांगताना ती म्हणाली, ‘आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. जेव्हा करिना माझ्याशी पहिल्यांदा बोलली होती तेव्हा ती म्हणाली की, हे बघ तुझी आई खूप छान व्यक्ती आहे. मला फक्त तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. तिने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी तिला छोटी आई वगैरे म्हणाली असती तर कदाचित ती स्वतःच माझ्यावर वैतागली असती.’ सारा आणि करिना अनेकदा एकत्र दिसतात. सारा करिनाच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्याच्यासाठी भेटवस्तूदेखील घेऊन गेली होती.


हे वाचा- बैबी डॉलच्या हॉट फोटोंमुळे शेतकरी कर्जबाजारी होता होता वाचला….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -