पुस्तक मेळाव्यात अभिनेत्रीला पर्स चोरताना पकडले, मोठ्या प्रमाणात रोकड जप्त

International Kolkata Book Fair Actress caught stealing purse
पुस्तक मेळाव्यात अभिनेत्रीला पर्स चोरताना पकडले, मोठ्या प्रमाणात रोकड जप्त

कोलकातामधील पुस्तक मेळाव्यात पर्स चोरीच्या आरोपाखाली अभिनेत्री रुपा दत्ताला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोलकातामध्ये खळबळ माजली आहे. चौकशीदरम्यान अभिनेत्रीकडे ७५ हजार रुपयांची रक्कम सापडली आहे. लोकांचे लक्ष विचलित करुन चोरी करण्याचा आरोप अभिनेत्रीवर करण्यात आला आहे. एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री रुपा दत्ता टीव्ही शोमध्ये काम करते. यापूर्वी तीने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आरोप केले होते.

आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्यात धक्कादायक घटना घडली आहे. टीव्ही शोमध्ये काम करणारी अभिनेत्री रुपा दत्ताला पर्स चोरी केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने रुपा दत्ताला कचऱ्याच्या डब्ब्यात रिकामी पर्स टाकताना पाहिले. बिदान नगर नॉर्थ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीला ताब्यात घेत तीची चौकशी केली. अनेक प्रश्न विचारल्यानंतर खरं सांगितले आहे. तपासादरम्यान एका बॅगेत अनेक पर्स आणि ७५ हजार रुपये रोकड जप्त करण्यात आले. रुपा दत्ताला लक्ष विचलित करुन चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत की, तिच्यासोबत अन्य कोणाचा सहभाग आहे का?

यापूर्वीही रुपा दत्ता होती चर्चेत

रुपा दत्ता यापूर्वीसुद्धा चर्चेत होती. रुपाने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळ केला असल्याचा आरोप केला होता. एका व्यक्तिसोबतचे संभाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. यामुळे एकच खळबळ माजली होती. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या नावाचा समावेश होता. परंतु या प्रकरणात पोलिसांना काही ठोस पुरावा सापडला नाही.

पोलिसांच्या चौकशीमध्ये अद्याप ही बाब समोर आली नाही की, अभिनेत्रीकडे एवढ्या प्रमाणात पैसे कुठून आले. दरम्यान अभिनेत्रीने पर्स चोरी केली असल्याचे कबुल केले आहे. तिने सांगितले आहे की, वेगवेगळ्या मेळाव्यात, गर्दी असलेल्या जागी लोकांची पर्स चोरी करत होती. आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात अभिनेत्रीची चालाकी फळाला आली नाही आणि पोलिसांनी रंगेहाथ पकडले.


हेही वाचा : दुसऱ्याच्या लग्नात अक्षय कुमारचा धिंगाणा; स्टाईल पाहून चाहते म्हणाले, ‘बेवफा’