घरमनोरंजनIrfan Khan Death Anniversary: इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावूक

Irfan Khan Death Anniversary: इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावूक

Subscribe

बॉलीवूडस्टार इरफान खान याला जगाचा निरोप घेऊन दोन वर्ष झाले आहेत. पण चाहत्यांच्या मनात आजही इरफानच्या आठवणी ताज्या आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच इरफानचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण इरफानचा मुलगा बाबिल मात्र सोशल मीडियावर पित्याचा फोटो पोस्ट करत आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत होता. आज इरफानचा दुसरा स्मृतीदिन असल्याने बाबिल भावूक झाला असून त्याने इरफानचा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

बाबिलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात इरफान पत्नी सुतापा सिकंदर बरोबर दिसत आहे. एका तळ्यात दोघेही बोटींगचा आनंद घेत असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. बाबिलने हा फोटो शेअर करत त्याखाली एक पोस्ट लिहली आहे. त्यात नॉर्वेमध्ये लाईट डान्स पाहण्यासाठी तो वडिलांसोबत गेला होता .त्यावेळी त्यांनी जे परफ्युम वापरले होते त्याचा सुगंध आजही मनात दरवळत असल्याचं बाबिलने म्हटले आहे. वडिलांच्या आठवणी आपल्याला क्षणाक्षणाला अस्वस्थ करत असून त्यातून तो बाहेर पडू शकत नसल्याचे बाबिलने म्हटलं आहे. तसेच त्याने वडिलांवर एक कविता लिहली आहे. त्यात आपले वडील स्वप्नात श्वास घ्यायचे. शांततेच ते व्यक्त व्हायचे असेही बाबिलने कवितेत म्हटले आहे.

इरफान खान यांचे २० एप्रिल २०२० रोजी निधन झाले. इरफान खान मेंदुशी संबंधित दुर्धर आजाराने ग्रस्त होता. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -