घरमनोरंजनजत्रा चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण; सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट शेअर करत दिला...

जत्रा चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण; सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट शेअर करत दिला आठवणींना उजाळा

Subscribe

अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही जत्रा चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यासंबंधी सिद्धार्थने एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वेगवेगळ्या धाटणीचे अनेक दर्जेदार चित्रपट येत आहेत. इतर चित्रपटांप्रमाणे मराठीत कॉमेडी चित्रपट सुद्धा परीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशातच केदार शिंदे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला जत्रा हा चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात आहे. 2006 साली जत्रा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावर्षी या चित्रपटाला १६ वर्षे पूण झाली आहेत.

जत्रा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला लावले होते. भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे, क्रांती रेडकर, विजय कदम या कलाकारांच्या या चित्रपटात महत्वच्या भूमिका होत्या. सातारा जिल्ह्यातील एका गावामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाला होते.

- Advertisement -

केदार शिंदे यांनी एक व्हिडीओ शेअर करत ‘जत्रा’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता आहे. दरम्यान केदार शिंदे यांच्या नंतर अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही जत्रा चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यासंबंधी सिद्धार्थने एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.

सिद्धार्थ जाधव त्याच्या पोस्ट म्हणाला…

- Advertisement -

“१७ वर्ष जत्राची.. #आपलासिध्दू, एवढी वर्ष मायबाप रसिक ‘जत्रा’ वर प्रेम करतायत. या सिनेमात काम मिळण्यापासून ते माझ्या कामाचं कौतुक होण्यापर्यंत.. सगळं श्रेय जातं केदार शिंदे सरांना… आणि भरत जाधव सर… काम करताना सहकलाकराचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे भरत सरांकडून शिकावं… उत्तम कलाकार, कमाल सहकलाकार आणि सर्वोत्तम माणूस.. संपूर्ण टिम जत्रा… गण्या,कुशा,रम्या,संजा..लव्ह यू. विजू मामा तुम्हाला खूप मिस करतोय. #jatra”

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहते सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत.


हे ही वाचा –  कलाकृतींच्या प्रमोशनचे फंडे! निर्माता – कलावंतांकडून माध्यमांचा प्रभावी वापर!

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -