घरमनोरंजनकलाकृतींच्या प्रमोशनचे फंडे! निर्माता - कलावंतांकडून माध्यमांचा प्रभावी वापर!

कलाकृतींच्या प्रमोशनचे फंडे! निर्माता – कलावंतांकडून माध्यमांचा प्रभावी वापर!

Subscribe

प्रत्येक गोष्टीचा एक टार्गेट ऑडियन्स असतो आणि त्यासाठी कशाप्रकारे प्रमोशन करायचे जेणेकरून प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

सध्याच्या युगात एखादी कलाकृती किंवा कोणतीही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचं मार्केटिंग केलं जातं. कोणतीही गोष्ट नावारूपाला येण्यासाठी मार्केटिंग आणि प्रमोशन या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एखादं प्रॉडक्ट किंवा चित्रपट सुपर हिट ठरतो किंवा एखाद्या चित्रपटाने कमी दिवसांत कोट्यवधींची कमाई केली असं आपण म्हणतो, तेव्हा त्यामागे त्याचं प्रमोशन कसं होतं, हा महत्वाचा मुद्दा असतो. चित्रपट, नाटक किंवा मालिका यांच्या प्रमोशनसाठी पी. आर. कंपनी किंवा कलाकारांकडून नेहमीच वेगवगेळे फंडे वापरले जातात. प्रमोशन ट्रिक्स जेवढ्या वेगळ्या असतात तेवढीच तुमची कलाकृती हिट होण्याच्या शक्यता वाढतात.

एक -दोन दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष ही सर्वाधिक चर्चेत आली होती. तर मुद्दा असा होता की अमृता सुभाष हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. अमृताने जी पोस्ट केली होती त्यात यामध्ये प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह असलेली स्ट्रीप दिसत आहे. त्या फोटोखाली अमृताने ”एका आश्चर्याची सुरुवात झाली”, असं कॅप्शन सुद्धा दिले होते. त्यामुळे अमृता सुभाषवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. मात्र त्या नंतर अमृताने याचा खुलासा करत असे म्हटले की ‘अमृता प्रेग्नन्ट नसून जया प्रेग्नन्ट आहे.’ जया म्हणजे अमृता सुभाषच्या आगामी वंडर वुमन चित्रपटातील व्यक्तिरेखेचे नाव! आणि अमृताने प्रेग्नन्सीसंदर्भात जी पोस्ट केली होती, ती केवळ तिच्या वंडर वुमन या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी. म्हणजेच याचा अर्थ असा की, चित्रपटाचं प्रमोशन कसं केलं जात आहे आणि त्याचा प्रेक्षकांवर कसा प्रभाव होणार हे चित्रपटांच्या पी. आर. कंपनी योग्यरीतीने जाणून असतात.

- Advertisement -

प्रत्येक गोष्टीचा एक टार्गेट ऑडियन्स असतो आणि त्यासाठी कशाप्रकारे प्रमोशन करायचे जेणेकरून प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. बहुतांश वेळा हे प्रयत्न यशस्वी होतात आणि एखादी कलाकृती चर्चेत येते. हेच त्या प्रमोशन मागचं यश असतं. सध्या तर प्रमोशनसाठी अशा अनेक क्लुप्त्या बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेसृष्टीत सुद्धा वापरतात. चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सुद्धा वेगवगेळ्या आयडिया असतात. पण जुन्या काळात असे नव्हते. पूर्वीच्या काळी चित्रपट त्यातील गाणी, अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असत. पण १९९३ साली प्रदर्शित झालेल्या गर्दिश चित्रपटाने प्रमोशन वेगळाच मार्ग अवलंबला होता. जॅकी श्रॉफची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. ‘जॅकी श्रॉफला अटक’ अशा स्वरुपाच्या बातम्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाचक हाती पेपर येताच पहिल्यांदा ही बातमी वाचत असे. पर्यायाने गर्दिश हा चित्रपट चर्चेत आला होता.


हे ही वाचा –  ट्विटरचा मालकी हक्क इलॉन मस्ककडे येताच कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट अ‍ॅक्टिव्ह 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -