घरमनोरंजन'गडद' चित्रपटातून पाहायला मिळणार जय दुधाणे आणि नेहा महाजन यांची केमिस्ट्री

‘गडद’ चित्रपटातून पाहायला मिळणार जय दुधाणे आणि नेहा महाजन यांची केमिस्ट्री

Subscribe

'गडद' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच स्कूबा डायव्हिंगवर आधारलेला चित्रपट  पहायला मिळणार आहे. या आगामी मराठी चित्रपटातून एक अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे.

‘बिग बॉस मराठी ३’ फेम जय दुधाणे आणि मराठी अभिनेत्री नेहाजन महाजन यांचा ‘गडद’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच स्कूबा डायव्हिंगवर आधारलेला चित्रपट  पहायला मिळणार आहे. ‘गडद’ या आगामी मराठी चित्रपटातून एक अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे. या निमित्ताने मराठी पडद्यावर रसिकांना पहिल्यांदाच स्कूबा डायव्हिंग पाहिल्याचा अनुभव घेता येईल. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘गडद’च्या मोशन पोस्टरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतले होते, ही जोडी रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवण्यासाठी सज्ज झाली आहे.

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वराह सिंग यांनी ‘गडद’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नेहा महाजन आणि जय दुधाणे प्रथमच दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री पहाण्याची संधी मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिलं शूटिंग शेड्यूल मालदिव्जमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे. शूटिंग स्पॅाटवर शूट करण्यात आलेल्या नेहाच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यावेळी जयसोबत नेहा मालदीव्जमध्ये काय करतेय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तरही आता स्पष्ट झालं आहे. दोघांनीही ‘गडद’ चित्रपटाच्या शूटिंगसाठीच मालदीव्जला गेले आहेत. आता या चित्रपटाचं पुढील शूटींग गोव्यात सुरू होणार आहे. या चित्रपटात जरी प्रेक्षकांना प्रथमच स्कूबा डायव्हिंग पहायला मिळणार असलं, तरी कथानक नेमकं काय आहे हे रहस्य अद्याप उलगडलेलं नाही.

- Advertisement -

जय आणि नेहा या दोघांनाही या चित्रपटासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे. या दोघांसह या चित्रपटात शुभांगी तांबाळे, नितीन गावंडे, आरती शिंदे यांच्यासह आणखी काही कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मंदार इंगळे आणि नितीन गावंडे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर असून कार्यकारी निर्माते आहेत प्रवीण वानखेडे. डिओपी वेंकटेश प्रसाद या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत आहेत. अभिषेक खणकर यांनी गीतरचना लिहिल्या असून, त्या संगीतबद्ध करण्याची जबाबदारी गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतकडं सोपवण्यात आली आहे. आदिनाथ पोहनकरचं पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभणार असून किरण बुराडे यांनी या चित्रपटासाठी कॅास्च्युम डिझाईनींगचं काम केलं आहे.

 

महाराष्ट्र दिनानिमित्ताने ‘बलोच’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -