घरमनोरंजनकाजोलच्या 'सलाम वेंकी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या ‘सलाम वेंकी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून काजोलचा हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करत या चित्रपटाची घोषणा करणयात आली होती. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सलाम वेंकी एक भावनिक चित्रपट असून यामध्ये एका आई आणि मुलाची जोडी दाखवण्यात आली आहे.

‘सलाम वेंकी’ ट्रेलर रिलीज

- Advertisement -

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरच्या सुरुवातीला सुजातीच्या भूमिकेतील काजोल आणि तिचा मुलगा दिसत आहेत. चित्रपटामध्ये वेंकीला असा आजार आहे, जो दिवसेंदिवस त्याला अधिक कमकुवत करत आहे. तो चित्रपटात व्हीलचेअरवर दिसतोय. वेंकीच्या आईला तिच्या मुलाची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. परंतु प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी आई मुलाची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी नकार देते. आता वेंकीची शेवटची इच्छा नक्की कोणती आहे. ज्यामुळे आई आणि मुलामध्ये नाराजी तयार झाली. हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

‘सलाम वेंकी’मध्ये आमिर खान देखील दिसणार
या चित्रपटामध्ये काजोल, विशाल जेठवा यांच्या व्यतिरिक्त राहुल बोस, राजीव खंडेलवाल, अहाना कुमरा आणि प्रकाश राज देखील महत्वाच्या भूमिकेत दिसतील. तसेच चित्रपटात थोड्या वेळासाठी अमीर खान देखील दिसणार आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

नातीच्या पॉडकास्टमधून जया बच्चन यांचं स्त्रियांच्या संवेदनशील विषयावर बोट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -