घरमनोरंजन'कलंक'च्या पहिल्या गाण्यात 'असा' असेल आलियाचा अंदाज

‘कलंक’च्या पहिल्या गाण्यात ‘असा’ असेल आलियाचा अंदाज

Subscribe

ट्रेलर रिलीज होण्यास जरी अवकाश असला तरी 'कलंक' सिनेमाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याबद्दल बोलतांना संगीतकार प्रीतम यांनी आपल्यी ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून एक सीक्रेट शेअर केले आहे.

आलिया भट्ट आणि वरून धवन यांच्यासह बडे कलाकार असणारा ‘कलंक’ सिनेमा १७ एप्रिलला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. ‘कलंक’चा टिझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांसोबत चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला  पोहोचली आहे.
ट्रेलर रिलीज होण्यास जरी अवकाश असला तरी ‘कलंक’ सिनेमाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार प्रीतम यांनी आपल्यी ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून एक सीक्रेट शेअर केले आहे.

- Advertisement -

आलिया कथ्थक नृत्य करतांना दिसणार

“’कलंक’ सिनेमातील पहिल्या गाण्यास संगीत देत आहे, आणि आलियाने या गाण्याकरिता आपल्या कथ्थक नृत्याच्या मुद्रांनी कमाल केले आहे.” असे प्रीतमने रविवारी ट्वीट करून सांगितले. यासोबतच ‘कलंक’मधील पहिले गाणे रिलीज होण्यापुर्वीच समोर आले की, त्या गाण्यात आलिया कथ्थक नृत्य करताना दिसणार आहे. प्रीतम स्वतःहा याबाबत खूप उत्सुक असल्याने याची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केल्याशिवाय राहिले नाही.

 

View this post on Instagram

 

ROOP ❤️ #WomenOfKalank

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

- Advertisement -

पहिल्या गाण्याबद्दल उत्सुकता 

प्रीतमने असे ट्वीट करून सांगितल्याने आपल्या चाहत्या वर्गाला पहिलं गाणं कसे असेल ? याची उत्सुकता अधिक वाढवून ठेवली आहे. ‘कलंक’च्या टिझरनंतर पहिले गाणं रिलीज केले जाईल की ट्रेलर यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. आलियाच्या चाहत्यांनी या ट्वीटला मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे. हा चित्रपट हिंदू-मुस्लीम वादावर आधारित असून  या सिनेमाचे बजेट साधारण ८० कोटी आहे.

चित्रपटात तगडी स्टार कास्ट

या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत, आलिया भट आणि वरूण धवन यांच्याबरोबर आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची स्टार कास्ट दमदार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -