घरमनोरंजनलोकसभा निवडणूक लढवणार नाही- कमल हसन

लोकसभा निवडणूक लढवणार नाही- कमल हसन

Subscribe

पहिले अभिनेते आणि त्यानंतर नेते बनलेल्या कमल हसन यांनी रविवारी लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे

प्रसिद्ध अभिनेते आणि मागील वर्षीच मक्कल नीधि मय्यम पार्टीची स्थापना करुन राजकारणात सक्रीय झालेल्या कमल हसन यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी लोकसभा लढवणार नसलो, तरी माझ्या पक्षातील उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. मी त्यांच्या प्रचारत सहभागी होत प्रचाराची धुरा सांभाळेल असे ते म्हणाले आहेत. तमिळनाडु लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा त्यांचा पक्ष लढवणार असून उमेदवारांची यादी आणि निवडणुकी साठीचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला आहे. कमल हसन यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केल्यानंतर स्वत:च्या उमेदवारी बाबत रविवारी काय ते स्पष्ट करेन असे सागिंतले होते.

- Advertisement -

जाहीर नामा प्रसिद्ध

दरम्यान, तमिळनाडुच्या मक्कल नीधि मय्यम पक्षाच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादी बरोबरच १८ व्या लोकसभेसाठीचा पक्षाचा जाहिरनामा देखील त्यांनी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये तरुणांसाठी नोकऱ्या, सगळ्यांना समान वेतन, महिलांसाठी आरक्षण, शेतकऱ्यांना कर्ज माफी आशा अनेक मुद्दयांचा त्यात समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून अनेक स्टर प्रचारकांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जात आहे. कमल हसन आधी अभिनेते परेश रावल यांनी आगामी लोकसभा लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. २०१४ साली गुजरातच्या अहमदाबाद येथुन त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती.

काँग्रेस सोबत करणार होते आघाडी

कमल हसन यांची मक्कल नीधि मय्यम पार्टी याआधी काँग्रेस सोबत आघाडी करणार होती. त्यासाठी कमल हसन यांनी सोनिया गांधींची भेट देखील घेतली होती. मात्र त्यानंतर आपण स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. मक्कल नीधि मय्यम या पक्षाचे ग्रामिण भागातील तमिळनाडुचा विकास आणि भ्रष्टाचारा विरोधात लढाई असे ध्येय असल्याचे कमल हसन यांनी या याधीच म्हटले आहे. तेंव्हा आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला लोक कितपत स्विकरतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -