Kangana Ranaut: शीख धर्मियांचा खलिस्तानी उल्लेख, कंगानाला दिल्ली विधानसभा समितीकडून समन्स

आपचे आमदार राघव चड्ढा या समितीचे अध्यक्ष आहेत.

Kangana Ranaut summoned by delhi assembly panel over remark of sikhs
Kangana Ranaut: शीख धर्मियांचा खलिस्तानी उल्लेख, कंगानाला दिल्ली विधानसभा समितीकडून समन्स

शीख धर्मियांचा उल्लेख खलिस्तानी असा केल्यानंतर कंगनाच्या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात  दिल्ली विधानसभेच्या शांती आणि सद्भाव समितीकडून अभिनेत्री कंगना समन्स बजावण्यात आले आहे. ६ डिसेंबरला दुपारी १२ वाजचा कंगनाला समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपचे आमदार राघव चड्ढा या समितीचे अध्यक्ष आहेत. शीख धर्मियांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कंगनाला हे समन्स बजावण्यात आले आहेत. दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीकडून देखील मुंबईत कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीख धर्मियांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वार प्रबंधत समितीने सायबर सेलमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती. कंगनाने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने ‘केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला कंगनाने जाणून बुजून खलिस्तानी आंदोलन म्हटले. कंगनाने मुद्दाम शीख धर्मियांच्या विरोधात आपत्तीजनक आणि अपमानास्पद भाषेचा उपयोग केला. कंगानेन शीख धर्मियांच्या विरोधात केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आणि धर्माची प्रतिमा धूळीला मिळवणाऱ्या भाषेचा वापर केला’,असे विधानसभा समितीने म्हटले आहे. दिल्ली शीख गुरुद्वार प्रबंधक समितीने केलेल्या तक्रारीत, शीख धर्मीयांच्या भावना दुखावण्यासाठी जाणून बुजून अशाप्रकारची पोस्ट केल्याचे म्हटले गेले आहे.

कंगनाने शेतकरी आंदोलनावरुन फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट लिहिली होती ज्यात तिने म्हटले होते की, ‘खलिस्तानी शेतकरी जरी आज सरकारच्या हात पिरगळण्याचा प्रयत्न करत असतील परंतु एका महिलेला विसरू नका त्यांनी त्यांना आपल्या चपलेखाली चिरडले होते. मात्र त्यांनी या देशाला कितीही त्रास दिला असला तरी त्यांनी जिवाची बाजी लावून त्यांना डासासारखे चिरडले पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत त्यांच्या मृत्यूनंतरही आजही त्यांच्या नावाने हे प्रकरण ओळखले जाते’ ,असे कंगनाने म्हटले होते.


हेही वाचा – कंगनाला जेलमध्ये टाका नाहीतर वेड्यांच्या रुग्णालयात- शीख समुदायाची मागणी