घरमनोरंजनकार्तिक-कियाराच्या 'सत्यनारायण की कथा' चित्रपटाचं बदलण्यात आलं नाव

कार्तिक-कियाराच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटाचं बदलण्यात आलं नाव

Subscribe

या चित्रपटात कार्तिक आर्यनच्या भूमिकेचं नाव सत्यप्रेम आहे, तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचं नाव कथा हे आहे.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा आगामी ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचं नुकतंच नाव बदण्यात आलं आहे. निर्मात्यांनी विवादातून वाचण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच चित्रपचटाच्या नावावरूनही वाद सुरू झाला होता. अनेकांनी या चित्रपटाला हिंदू धर्माविरोधात असल्याचं म्हटलं, त्यानंतर आता निर्मात्यांनी सत्यनारायण की कथा हे नाव बदलून ‘सत्यप्रेम की कथा’ हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. सोबतच या चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

या चित्रपटात कार्तिक आर्यनच्या भूमिकेचं नाव सत्यप्रेम आहे, तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचं नाव कथा हे आहे. रविवारी कियाराचा वाढदिवस होता, त्याच निमित्ताने कार्तिक आर्यनने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, हॅप्पी बर्थडे कथा!! तुझा सत्यप्रेम सोबतचं #SatyapremKiKatha असं हॅशटॅग सुद्धा देण्यात आलं. यावरून या चित्रपटाच्या नव्या नावाची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

चित्रपटाच्या नावाला हिंदू धर्मियांचा विरोध
गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटाचं नाव बदण्यात येईल असं सांगितलं होतं. खरंतर या नावाला मध्य प्रदेशमधील काही हिंदुवादी संघटनांनी विरोध केला होता. चित्रपटाच्या नावाचा वाढता विरोध पाहून चित्रपटाचे दिग्दरर्शक साजिद नाडियावाला यांनी चित्रपटाचे नाव बदलण्यात येईल असं सांगितलं.


हेही वाचा :लाल सिंह चड्ढावर का टाकला जातोय बहिष्कार? आमिर खानने केली चित्रपट पाहण्याची विनंती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -