संसदेतील काँग्रेसच्या चार खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे; महागाईच्या मुद्द्यावरून चर्चा सुरु

motion to remove the suspension of mps passed in lok sabha

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यावरून सुरु असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही, या गोंधळामुळे सोमवारी सलग दोनवेळा लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. ज्यानंतर विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव मंजूर झाला आहे. ज्यामुळे आता खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभेतील खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभेतील गोंधळ अखेर संपला असून वाढत्या महागाईबाबत संसदेत चर्चेला सुरुवात झाली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशवात महागाई, जीएसटीसह अनेक मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल झाला. विरोधी पक्षांकडून सतत या मुद्द्यावरून विरोध दर्शवण्यात आला. यात आता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडीने केलेली अटक, केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारकडून होत असलेला गैरवापर आणि लोकसभा सदस्यांपैकी चार खासदारांना चालू अधिवेशनातून केले निलंबन यावरून काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला. जुलै अखेरीस संसदेत प्लेकॉर्ड दाखवल्यामुळे काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन करण्यात आले. मनिकम टागोर, टीएन प्रतापन, जोथिमाणि आणि राम्या हरिदास अशी या काँग्रेस खासदारांची नावं आहेत.

लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहात सोमवारी कामकाज सुरु झाले. मात्र काही वेळातच विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता पुन्हा सुरु झाल्यानंतर निलंबित खासदारांवरून गदारोळ निर्माण झाला. ज्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्याचदरम्यान ईडी कारवाईवरून राज्यसभेत गदारोळ आणि घोषणाबाजी करण्यात आली.

संसदेचे अधिवेशन सुरु होताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक बोलावली. या बैठकीत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले की, सरकार लोकसभा खासदारांचे निलंबन रद्द करण्यासाठी प्रस्ताव आणत आहे. यावेळी ओम बिर्ला यांनी सर्व सदस्य खासदारांना प्लेकार्ड न वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व खासदारांना ही अंतिम संधी दिली असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच आता प्लेकार्ड वापरणाऱ्या खासदारांना कारवाईला सामोरे जावे लागेल असेही त्यांनी नमुद केले.

काँग्रेस खासदार थरुर म्हणाले की, ईडीच्या गैरवापरामुळे चिंता वाढली आहे. सरकारी संस्थांची काम राजकीय फायद्यासाठी वापरता कामा नये, त्यांचे विशेष कार्य असते. आपण असा देशात राहतो जिथे लोकशाहीला स्वत:चे महत्त्व आहे जे आपण जपले पाहिजे. विरोधी नेत्यांचा आवाज दाबला जाऊ नये.

दरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस आणि काही पक्ष केवळ दंगली करण्यापुरते मर्यादित झालेत. राहुल गांधी सदनात येत नाहीत का ते माहीत नाही पण काँग्रेसचे लोक गंभीर नाहीत. महागाईच्या मुद्द्यावर आज चर्चा झाली असती तरी विरोधक आजही चर्चा करण्यास तयार नाहीत. यावरून विरोधकांचा चेहरा उघड होतो की ते लोक फक्त गोंधळ घालतात पण चर्चेवर त्यांचा विश्वास नाही.


हेही वाचा : शिवसेना खासदार संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी