घरमनोरंजन'रंग माझा वेगळा' मालिकेतील कार्तिकीने 'या' कारणामुळे सोडली मालिका

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिकीने ‘या’ कारणामुळे सोडली मालिका

Subscribe

कार्तिकी ही भूमिका साकरणारी बालकलाकार साईशा भोईर आता या मालिकेतून बाहेर पडणार आहे. यामागचे कारणही आता स्पष्ट झालं आहे

मराठी टेलिव्हिजनवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या मालिकेतील दिपा आणि कार्तिकच्या मुली दीपिका आणि कार्तिकी या दोघींनाही चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. या दोघींच्या गोड अभिनयाने मालिका सध्या जास्त प्रमाणात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.मात्र आता अशातच कार्तिकी ही भूमिका साकरणारी बालकलाकार साईशा भोईर आता या मालिकेतून बाहेर पडणार आहे. यामागचे कारणही आता स्पष्ट झालं आहे.

याकारणामुळे साईशाने सोडली मालिका
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकरणारी साईशा आता या मालिकेतून बाहेर पडणार आहे, याचं कारण म्हणजे साईशाला एका नव्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे तिने ही मालिका सोडायचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात साईशा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांपूर्वी साईशा आणि तिचे आई-वडीलांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाइव्ह केले होते. त्यावेळी त्यांनी साईशाने मालिका सोडल्याचे कारण सांगितले होते. त्यावेळी ते म्हणाले की, “साईशाला आता नवा प्रोजेक्ट मिळालेला आहे, त्यामुळे तिच्या हितासाठी आम्ही ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच आम्ही कल्याणला राहतो. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे शूटिंग मालाडमध्ये होते, रोज तिकडे जाण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे साईशाला शाळेत जाण्यासाठी आणि अभ्यासासाठी जास्त वेळ मिळत नव्हता. तसेच या शूटिंगच्या या दगदगीमुळे तिची प्रकृतीसुद्धा खराब होऊ लागली आहे”. असे ते म्हणाले.

तसेच साईशा म्हणाली की, “मला खूप कंटाळा आला होता, आता मला शाळेत जायचे आहे. कार्तिकीला तुम्ही खूप प्रेम दिले, आता असेच प्रेम नव्या कार्तिकीला सुद्धा द्या”. असं साईशा म्हणाली.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -