घरमनोरंजनKBC13च्या यंदाच्या पर्वामध्ये झाला महत्वपूर्ण बदल, फास्टेस फिंगर फर्स्ट पर्याय होणार...

KBC13च्या यंदाच्या पर्वामध्ये झाला महत्वपूर्ण बदल, फास्टेस फिंगर फर्स्ट पर्याय होणार गायब

Subscribe

ऑडियंस पोलचा पर्याय पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दशकापासून छोट्या पडद्यावर बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) ‘कौन बनेगा करोडपती’ (kaun banega crorepati 13) या शोची धूरा सांभाळत आहे. आता पुन्हा एकदा महानायक टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा तेरावा सिझन येत्या 23 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी टिव्ही या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. पण यंदाचा सिझन काही खास असणार आहे. मेकर्सने कौन बनेगा करोडपती तेराव्या सिझनमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. (kbc 13 new additions in to the show fastest finger first option will be remove)

‘कौन बनेगा करोडपती’ या शो मधील सेट यंदा खूपच आकर्षक पद्धतीने तयार केला गेला आहे. तसेच गेम टायमर ला ‘धुक-धुक जी’ असं नाव देण्यात आलं आहे. शोमधील स्पर्धकांची निवड प्रथम फास्टेस्ट फिंगर फर्स्ट या थीम अंतर्गत प्रश्नांची उत्तरे देऊन केली जात असे. पण आता फास्टेस्ट फिंगर फर्स्ट याचे रुपांतर ‘ट्रिपल टेस्ट’ मध्ये बदलण्यात आले आहे. पण हा बदल स्पर्धंकासाठी खूपच आव्हानात्मक ठरणार आहे. कारण आता स्पर्धकांना एका प्रश्ना व्यतिरिक्त तीन जनरल नॉलेजच्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. एका लेअरबोर्डावर प्रत्येक स्पर्धकांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर जो सर्वात आधी देणार त्याची वेळ मोजण्यात येणार आहे. जो स्पर्धक कमीत कमी वेळात तीन प्रश्नांचे उत्तर योग्य देणार तो स्पर्धक हॉट सीटवर बसू शकेल.

- Advertisement -

तसेच लाईफलाइन बद्दल बोलायचे झाल्यास कोरोना व्हायरसमुळे गेल्या सिझनपासून ऑडियंस पोल हा पर्याय बंद करण्यात आला होता. मात्र या सिझनमध्ये ऑडियंस पोलचा पर्याय पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित तीन लाइफलाइन मध्ये 50:50, आस्क द एक्सपर्ट आणि फ्लिप द क्वेश्चन हे पर्याय पूर्वीप्रमाणेच असणार आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा – विक्की- कॅटरीनाने गुपचूप उरकला साखरपुडा?,सत्य आले समोर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -