घरमनोरंजन' ...यापुढे सलमानच्या सिनेमाचे रिव्ह्यू करणार नाही' म्हणत केआरकेने घेतला सलमानशी पंगा

‘ …यापुढे सलमानच्या सिनेमाचे रिव्ह्यू करणार नाही’ म्हणत केआरकेने घेतला सलमानशी पंगा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यातच केआरकेने आता बॉलिवूडचा दबंग खान अभिनेता सलमान खानशी पंगा घेतला आहे. परंतु सलमानशी पंगा घेणे केआरकेला चांगलेच महागात पडले आहे. केआरकेने सलमानच्या राधे या सिनेमावर आणि एकंदरीत त्याच्या बिंग ह्युमन फाउंडेशनविरोधात अनके आरोप केलेत. परंतु हे आरोप आता केआरकेला चांगलेच भोवले आहेत. कारण सलमान खानने केआरकेविरोधात मुंबई कोर्टात मानहानीचा दावा ठोकला आहे. मानहानीची नोटीस मिळताच केआरकेने आता यापुढे सलमानच्या एकाही सिनेमांवर रिव्हू देणार नाही, असे केआरकेने जाहीर करत विवेक ओबेरॉय, अरिजीत सिंग यांचे नाव घेतले आणि सलमानने या वेळी चुकीच्या माणसाशी पंगा घेतला असे म्हटले आहे.

- Advertisement -

सध्या केआरकेने सलमानविरोधात केलेले ट्विट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहेत. तसचे नेटकऱ्यांकडूनही या ट्विटला बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. एकापाठोपाठ असे अनेक ट्विट केआरकेने शेअर केले आहेत. यातील पहिल्या ट्विटमध्ये केआरकेने म्हटले आहे की, “विवेक, जॉन, अरिजीत बिचारी साधी मुल होती. परंतु यावेळी त्याने चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे!,” असे ट्वीट केआरकेने केले आहे. केआरकेनेचे हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

याआधी केआरकेने सलमानचा १३ मे ईदच्या दिवशी रिलीज झालेला ‘राधे’ या सिनेमावर एक व्हिडिओ शेअर केला होता. याच त्याने ‘राधे’ सिनेमाचा निगेटिव्ह रिव्ह्यू केला होता. तसेच राधे सिनेमाची प्रचंड खिल्ली उडवली. ‘राधे’मध्ये काय विशेष आहे माहित नाही…’राधे’हा चित्रपट मी दुबईमध्ये पाहिली चिटपट पाहून माझी तब्येत बिघडली…तसेच हा सिनेमा म्हणजे कोरोनाची तिसरी लाट आहे असेही त्याने म्हटले.

- Advertisement -

केआरकेने आणखी एक ट्वीट शेअर करत लिहिले की, जर मला एखाद्या निर्माता, दिग्दर्शकांनी वा चित्रपटातील कलाकारांनी सांगितल्या शिवाय मी कुठल्याही सिनेमाचा रिव्ह्यू करत नाही. पण आता मला एका व्यक्तीने लाख विनव्या केल्या किंवा माझे पाय धरू देत तरीही मी त्याच्या सिनेमांचे रिव्ह्यू करणार नाही. सलमान खानने माझ्यावर मानहानीचा दावा केलाय, याचा अर्थ मी केलेल्या रिव्ह्यूवर सलमान नाराज आहे…म्हणूनच यापुढे मी त्याच्या कोणत्याच चित्रपटाचा रिव्ह्यू करणार नाही…माझा हा शेवटचा व्हिडीओ आज शेअर करतोय.”असेही त्याने म्हटले आहे.

दरम्यान सलमानच्या राधे सिनेमावर खराब रिव्ह्यु दिल्यामुळे सलमानने माझ्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे असे केआरके म्हणतोय. मात्र यावर सलमानच्या वकिलांनी स्पष्ट केले, मानहानीचा दावा राधे सिनेमाच्या रिव्ह्यूबद्दल नाही असे सांगितले. तर हा मानहानीचा दावा, सलमान भ्रष्टाचारी आहे, आणि त्याचे ब्रॅंड बिंग ह्युमन हे सगळ्यांची फसवणूक, हेराफेरी आणि ते मनी लॉंड्रींगच्या व्यवसायात गुंतले असे अनेक आरोप सलमानवर केल्यामुळे केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल केल्याचे वकीलांनी स्पष्ट केले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -