घरताज्या घडामोडीभुजबळ म्हणतात, उध्दव ठाकरे पंतप्रधान झाले तर आनंद, पवार झाले तर अत्यानंद

भुजबळ म्हणतात, उध्दव ठाकरे पंतप्रधान झाले तर आनंद, पवार झाले तर अत्यानंद

Subscribe

उध्दव ठाकरे यांच्या रूपाने मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला तर आनंदच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान झाले तर अत्यानंद होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली ते नाशिक येथे बोलत होते.

शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख व माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी लिहलेल्या एका लेखासंदर्भात त्यांनी हे भाष्य केले. या लेखात हर्षल प्रधान यांनी उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे म्हटले होते. याबाबत भुजबळांना विचारले असता ते म्हणाले, ठाकरे पंतप्रधान होणे यात आनंद आहे अन शरद पवार पंतप्रधान झाले तर अतिआनंद होईल. राज्यातील मराठी व्यक्ती राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचली आहे परंतू अजून पंतप्रधान झालेली नाही. त्यामुळे मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

मोदींचं काम अतीशय उत्तम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला ७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत याकडे आपण कसे पाहाता असे विचारले असता भुजबळ म्हणाले, अतीशय उत्तम काम आहे. अगदी परदेशातील प्रसिध्दी माध्यमांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे असे सांगत त्यांनी मोदींना टोला लगावला.

मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ६ जूनपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, देशात आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतू कोविड अद्याप संपलेला नाही. म्युकरमायकोसिसचा धोका वाढतोय. १४ जिल्हे अजूनही रेडझोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत आंदोलन करावे की नाही याबाबत त्यांनी ठरवावं असेही ते म्हणाले.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा कायदा मांडला त्याला आम्ही सहाकार्य केले. ओबीसीला धक्का लागणार नाही असे कलम त्यात टाकण्यात आले आहे. मला वाटतं आरक्षणाचा कायदेशीर लढा अजूनही संपलेला नाही. सुप्रीम कोर्टाने असे सांगितले आहे की, ओबीसी आरक्षणात त्यांचा सामावेश करावा की नाही याबाबत राष्ट्रपती व त्यांची समिती ठरवेल असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. आमचं म्हणणं इतकच धक्का न लागता आरक्षण मिळावे. आरक्षणाला आमचा पाठींबा असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -