लाल सिंग चड्ढामधील ‘फिर ना ऐसी रात आएगी’ गाणे प्रदर्शित

आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव आणि वायकॉम 18 स्टूडियो द्वारा निर्मित 'लाल सिंह चड्ढा'मध्ये करीना कपूर खान, मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत आहेत

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील ‘फिर ना ऐसी रात आएगी’ हे मोस्ट अवेटेड गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात भावपूर्ण संगीत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे. अलीकडेच आमिर खानने सोशल मीडियावर करीना कपूर खानचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये करीना या चित्रपटातील ‘फिर ना ऐसी रात आएगी’ हे गाणे दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे असल्याचे सांगते आहे.

आमिर खानने टी-सीरीजच्या सोशल मीडिया हँडलवर काही अत्यंत प्रतिभावान भारतीय निर्मात्यांसह लाइव्ह जात हे गाणे लॉन्च केले, यावेळी त्याने प्रेम, वियोग आणि तळमळ या मानवी भावनांवर वर चर्चा केली. काल आमिर खानने करीना कपूर खानचा एक व्हिडिओ देखील शेअर केला ज्यामध्ये अभिनेत्रीने ‘फिर ना ऐसी रात आएगी’ला दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे संबोधले.

दरम्यान, लाल सिंग चड्ढाची या आधीची दोन गाणी – ‘कहानी’ आणि ‘मैं की करां?’ संगीत रसिकांच्या हृदयाला भिडली आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी गायक, संगीतकार, तंत्रज्ञ आणि गीतकार यांच्या नावावर दोन्ही गाणी म्युझिक व्हिडिओशिवाय रिलीज केली आहेत.

आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव आणि वायकॉम 18 स्टूडियो द्वारा निर्मित ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये करीना कपूर खान, मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत आहेत.