घरमनोरंजनHBD: संजय दत्तचे आयुष्य चित्रपटापेक्षा कमी नाही, या घटनेमुळे सापडला होता अडचणीत

HBD: संजय दत्तचे आयुष्य चित्रपटापेक्षा कमी नाही, या घटनेमुळे सापडला होता अडचणीत

Subscribe

1993 साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणाच्या चौकशी दरम्यान संजय दत्त पुरता फसला होता.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता संजय दत्त याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा खासगी जीवनाच्या चर्चा नेहमीच सोशल मीडिया तसेत माध्यमावर रंगताना दिसतात. त्याच्या व्यक्तीगत आयुष्यात किती उतार -चढाव आले हे तर सर्वश्रूत आहे. 29 जुलै 1959 साली अभिनेता सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांच्या घरी संजय दत्तचा जन्म झाला. अभिनयाचा वारसा त्याला त्याच्या आई वडिलांकडूनच मिळाला आहे. असे म्हणायला हरकत नाही. आपल्या पालकांप्रमाणेच संजयने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्येचा जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. संजय दत्तचे जीवन त्याच्या चित्रपटाप्रमाणेच आहे. त्याच्या व्यक्तीगत आयुष्यात अनेक वळणे आली. कधी त्याने  स्वतःच्या पायावर कुऱ्हाड  मारुन घेतली तर कधी नशीबाने त्याच्यावर जोरदार आघात केला. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त संजय दत्तच्या आयुष्यात घडलेल्या अशा घटना बद्दल जाणून घेउयात ज्यामुळे त्याचे आयुष्य पुर्णपणे बदलून गेले.

1987 साली  ‘रॉकी’ या समिनेमातून संजय दत्तने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि तेव्हापासूनच त्याच्या आयुष्यातील वाईट काळ सुरू झाला. चित्रपट रिलीजच्या 3 दिवसापुर्वीच त्याच्या आईने अभिनेत्री नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला. यानंतर संजयला आमली पदार्थाचे प्रचंड व्यसन लागले होते यामुळे त्याला पाच महिन्याचा तुरूंगवास सहन करावा लागला तसेच अमेरिकेतील नशा मुक्ति केंद्रात 2 वर्षे त्याने ड्रग्स पासून मुक्ती मिळवण्याच्या प्रर्यत्न केला आणि बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एंन्ट्री केली.

- Advertisement -

यानंतर संजयला स्वत:पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या ऋचा शर्मावर प्रेम जडले आणि त्यांनी विवाह केला पण काही दिवसाताच ऋचाला कॅन्सरचे निदान झाले यामुळे संजय दत्तला प्रचंड मानसिक त्रासाल सामोरे जावे लागले होते. पण सिनेसृष्टीत त्याच्या करीयरचा ग्राफ वाढत होता. साजन,सडक,खलनायक सारखे चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलेच गाजले होते.

1993 साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणाच्या चौकशी दरम्यान संजय दत्त पुरता फसला होता. त्याने स्वत: जवळ हत्यार बाळगल्याने त्याला  तुरूंगवासाची क्षिक्षा भोगावी लागली तसेच 20 वर्षापर्यंत कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. ‘मुन्नाभाई’ सिनेमा नंतर पुन्हा एकदा संजय दत्त पेटून उठला व त्याची बॅड बॉय इमेज बदलू लागली.

- Advertisement -

हे हि वाचा – Maharashtra Flood : अभिनेत्री दिपाली सय्यदने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात; १० कोटींची केली मदत

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -