घरCORONA UPDATEडॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर अजय संतापला!

डॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर अजय संतापला!

Subscribe

कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकजण देशात प्रत्येतजण लढत आहेत. पोलीस, डॉक्टर्स, नर्स, इतर कर्मचारी वर्ग आणि सफाई कामगार तर या काळात २४ तास काम करत आहेत. कोरोना हरवायचं असेल तर घरातून बाहेर पडू नका असे आवाहन वेळोवेळे या सर्वांनी केले अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी देखील नागरिकांना विनंती केली. तरीही नागरिक आज रस्त्यावर फिरताना दिसतात. मात्र हे बाहेर फिरणारे लोक अनेक वेळा गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करतात. नुकतीच निहंग शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसाचा डावा हात कापला गेला. त्याबरोबर रुग्णालयात रुग्णांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याचं दिसून आलं. या प्रकरणांवर अभिनेता अजय देवगणने संताप व्यक्त केला आहे.  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करत त्याने राग व्यक्त केला आहे.

- Advertisement -

अजय देवगणने ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.  “काही सुशिक्षित लोकांनी एका माहितीच्या आधारे शेजारील डॉक्टर कुटुंबावर हल्ला केला. या माहितीमध्ये किती सत्यता होती हे देखील पडताळून पाहण्याचे कष्ट या लोकांनी घेतले नाहीत. या लोकांचा प्रचंड राग आला आहे. सत्यता न जाणता असं कृत्य करणारेच खरे दोषी असतात”, असं ट्विट अजयने केलं आहे.

- Advertisement -

अजयच्या या ट्वीटरवर अनेक सकारात्मक प्रतिक्रीया आल्या आहेत. सगळ्यांनी अजयच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. खरतर या आधीच डॉक्टर किंवा परिचारिकांवर हल्ला केला किंवा त्यांच्याशी गैरवर्तन केलं तर त्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. पण तरीही अशाप्रकारचे हल्ले सुरूच आहेत.


हे ही वाचा – कोरोनापासून वाचण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांचा मास्टर प्लॅन तयार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -