घरताज्या घडामोडी'रंजिश ही सही' १३ जानेवारीपासून ओटीटीवर

‘रंजिश ही सही’ १३ जानेवारीपासून ओटीटीवर

Subscribe

सिरीजमध्‍ये भट्ट यांच्‍या स्‍टाइलसह आभास व श्रेयस यांनी संगीतबद्ध केलेली गाणी पाहायला मिळतील. रेखा भारद्वाज, विशाल मिश्रा, जावेद अली व अॅश किंग यांनी ही गाणी गायली आहेत.

डिजिटल व्हिडिओ मनोरंजन क्षेत्रामध्‍ये नवीन युजर्सची भर झाल्याने ओव्‍हर दि टॉप (ओटीटी) व्‍यासपीठांना नवीन शैलींसह प्रयोग करत त्‍यांच्‍या ओरिजिनल कन्‍टेन्‍ट ऑफरिंग्‍ज विस्‍तारित करण्‍यास चालना दिली आहे. राष्‍ट्रीय, ४ जानेवारी २०२२: वूट सिलेक्‍टने स्‍थापनेपासून नेहमीच प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम कन्‍टेन्‍ट सादर केला आहे आणि त्‍यांच्‍या ओरिजिनल कन्‍टेन्‍ट ऑफरिंगमध्‍ये वाढ केली आहे. व्‍यासपीठ वरचढ ठरणारी आणखी एक उल्‍लेखनीय सिरीज ‘रंजिश ही सही’सह आपली व्‍याप्ती वाढवण्‍यास सज्‍ज आहे. काही वर्षांच्‍या आठवणी आपल्‍या स्‍मरणात कायमस्‍वरूपी राहतात आणि बॉलिवुडच्‍या ७०च्‍या सुवर्ण दशकामध्‍ये स्थित नाट्यमय प्रेमकथा ‘रंजिश ही सही’ सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. मुकेश भट्ट व जिओ स्‍टुडिओज निर्मित या वेब सिरीजमध्‍ये ताहिर राज भासिन, अमला पॉल व अमृता पुरी प्रमुख भूमिकेत आहेत.

महेश भट्ट यांची निर्मिती, पुष्‍पदीप भारद्वाज यांचे लेखन व दिग्‍दर्शन असलेली विशेष एंटरटेन्‍मेंट प्रॉडक्‍शनची ‘रंजिश ही सही’  ही सिरीज नवोदित आवारा चित्रपट दिग्‍दर्शकाच्‍या अवतीभोवती फिरते. त्‍याचे एका विलक्षण सुपरस्‍टारसोबत विवाहबाह्य प्रेमप्रकरण जुळते, ज्‍यामुळे त्‍याच्‍या जीवनाला कायमस्‍वरूपी कलाटणी मिळते. त्‍याच्‍या पहिल्‍या प्रेमिकेसोबतचा विवाह विस्‍कळीत होतो आणि तो दोन विश्‍वांमध्‍ये अडकून जातो. मुख्‍यत्‍वे बॉलिवुडचे ७०चे दशक म्‍हणजेच बेलबॉटम्‍सच्‍या सुवर्ण युगामध्‍ये स्थित आणि उत्तम संगीत असलेल्‍या या सिरीजचे कथानक शंकर, आमना व अंजू यांच्‍या जीवनांच्‍या अवतीभोवती फिरते. कथानक प्रौढ व्‍यक्तींमधील जटिल मानवी नाते आणि प्रेमाच्या विभिन्‍न छटांना दाखवते. प्रखर ड्रामा असलेली ही सिरीज प्रलोभन, निषिद्ध प्रेम, उत्कटता, विश्‍वास, विवाह, निष्ठा, बिनशर्त, स्थिरता, ध्यास आणि अनेक भावनांमधील दुरावा या बाबींना सादर करते.

- Advertisement -

सिरीज ग्‍लॅमरस युगाच्‍या त्‍या सुवर्ण क्षणांमध्‍ये घेऊन जात जुन्‍या आठवणींना उजाळा देण्‍यासोबत बॉलिवुडमधील सर्जनशीलरित्‍या संपन्‍न व साहसी काळाला देखील दाखवते. तसेच सिरीजमध्‍ये भट्ट यांच्‍या स्‍टाइलसह आभास व श्रेयस यांनी संगीतबद्ध केलेली गाणी पाहायला मिळतील. रेखा भारद्वाज, विशाल मिश्रा, जावेद अली व अॅश किंग यांनी ही गाणी गायली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tahir Raj Bhasin (@tahirrajbhasin)

- Advertisement -

सिरीजबाबत सांगताना उत्‍साहित दिग्‍दर्शक पुष्‍पदीप भारद्वाज म्‍हणाले, ”अनेक थ्रिलर्स व क्राइम शोज बनवले जात असताना मी वरचढ ठरेल अशी संगीतमय व नाट्यमय प्रेमकथा बनवण्‍यास उत्‍सुक होतो. बरेच संशोधन व अनेक संवादांच्‍या माध्‍यमातून ‘रंजिश ही सही’ची निर्मिती करण्‍यात आली. जटिल मानवी भावना सादर करण्‍याचा प्रयत्‍न करणारी ही सिरीज चित्रपटसृष्‍टीचा सुवर्ण काळ म्‍हणजेच भव्‍य ७०च्‍या दशकाला सादर करते. आजच्‍या आव्‍हानात्‍मक काळादरम्‍यान त्‍या काळाला पुन्‍हा सादर करण्‍याचा अनुभव करिष्‍माई होता आणि जिओ स्‍टुडिओजमधील उदारतेशिवाय हे शक्‍य झाले नसते. आता सिरीज पूर्णत: तयार असताना मला खूप आनंद झाला आहे आणि प्रेक्षकांना आमची प्रेमकथा पाहताना बघण्‍यासाठी अत्यंत उत्सुक आहे.

विविध छटा असलेली भूमिका साकारण्‍याबाबत मत व्‍यक्‍त करताना ताहिर राज भसिन म्‍हणाला, ”मला या अद्वितीय प्रेमकथेचे कथानक सांगण्‍यात आले तेव्‍हा मी विविध छटा असलेली भूमिका शंकरमध्‍ये त्‍वरित सामावून गेलो. रोमँटिक ड्रामाच्‍या आव्‍हानाने माझे लक्ष वेधून घेतले, जेथे प्रमुख पात्र त्‍याच्‍या जीवनामध्‍ये दोन महिलांच्‍या प्रेमामध्‍ये अडकला आहे. शंकर असुरक्षित रोमँटिक व अधिकृत बंडखोर यामधील दुवा स्‍पष्‍ट करतो. ही भूमिका साकारणे जटिल भावनात्‍मक रोलर कोस्‍टर असण्‍यासोबत धमाल अनुभव होता.’

 


हेही वाचा – Movie Postponed: RRR सह ‘या’ 4 हटके सिनेमांची रिलीज पुढे ढकलली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -