घरमनोरंजनVideo: मुंबई झोपडपट्टीत राहणाऱ्या मलिशाला साथ अभिनेता रॉबर्ट हॉफमॅनची; अचानक झाली फेमस

Video: मुंबई झोपडपट्टीत राहणाऱ्या मलिशाला साथ अभिनेता रॉबर्ट हॉफमॅनची; अचानक झाली फेमस

Subscribe

मलिशा तिचे स्टाइलिश फोटो आणि व्हिडिओही शेअर करत आहे, ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय होत आहेत.

मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारी मलिशा खारवा सध्या हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅनमुळे चांगलीच चर्चेत आहे. मलिशाच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स सातत्याने वाढत आहेत, ज्यामुळे द स्ट्रीट्सचा अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन असून अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन फेब्रुवारीमध्ये आपल्या म्युझिक व्हिडिओसह भारतात आला होता. या दरम्यान त्याने मलिशाची भेट घेतली. मलिशाला एक यशस्वी मॉडेल बनायचं आहे, याकरता अभिनेता तिला साथ देत आहे. मलिशा आणि रॉबर्टचे व्हिडिओ बर्‍याचदा व्हायरल होताना दिसतात. एका व्हिडिओमध्ये मलिशा रॉबर्टला हिंदी शिकवताना दिसतेय

- Advertisement -

व्हिडिओमध्ये, मलिशा रॉबर्टला हिंदी शिकवताना असे म्हणते की, “माझा फोन खराब झाला” रॉबर्टची तुटक हिंदी ऐकून प्रत्येकजण हसतो. आतापर्यंत मलिशाच्या इन्स्टाग्रामवर २१ हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. आता मलिशा तिचे स्टाइलिश फोटो आणि व्हिडिओही शेअर करत आहे, ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय होत आहेत.

- Advertisement -

अलीकडेच मलिशाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपले जीवन कसे जगत आहे हे दाखवत आहे. व्हिडिओमध्ये ती आपले घर आणि झोपेची जागा दाखवित असून चाहते मलिशाच्या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट करत आहेत आणि त्यांचा प्रतिक्रिया देखील देत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -