घरताज्या घडामोडीमराठी कलाकारांची बाप्पाला आर्त हाक, 'तू परत ये'!

मराठी कलाकारांची बाप्पाला आर्त हाक, ‘तू परत ये’!

Subscribe

प्रथमेश परब, प्रणव रावराणे, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, विजय आंदळकर, निखिल राऊत, समीर धर्माधिकारी, सिध्देश्वर झाडबुके, जयेश चव्हाण आणि स्वरूप बाळासाहेब सावंत ह्या १० कलाकारांचा ह्या गाण्यात समावेश आहे.

ड्रिम टॉकीज प्रॉडक्शन प्रस्तुत सचिन दुबाले पाटील निर्मित, ‘तू परत ये’ हे मराठी गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. स्वरूप बाळासाहेब सावंत दिग्दर्शित ‘तू परत ये’ हे गाणे एस. सागर यांनी लिहून संगीतबध्द केलेले आहे. तर सागर फडकेने हे गाणे गायले आहे. कोरोनामूळे उद्भवलेल्या लॉकडॉउन आणि नकारात्मक वातावरणात सर्वांना प्रेरणा आणि उभारी देण्यासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

प्रथमेश परब, प्रणव रावराणे, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, विजय आंदळकर, निखिल राऊत, समीर धर्माधिकारी, सिध्देश्वर झाडबुके, जयेश चव्हाण आणि स्वरूप बाळासाहेब सावंत या १० कलाकारांचा या गाण्यात समावेश आहे.

- Advertisement -

या गाण्याचे निर्माते सचिन दुबाले पाटील ह्यांनी आत्तापर्यंत कॉलेज डायरी, धुमस, खिचिक अशा ७ मराठी सिनेमांमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम केले आहे. सचिन या गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतात, “सध्या लॉकडाऊनमूळे सिनेसृष्टी बंद आहे. सगळीकडे कोरोनामूळे नकारात्मक वातावरण आहे. अशावेळी नवी उमेद जागण्यासाठी एका सकारात्मक गाण्याची निर्मिती करावी असं वाटलं, म्हणून ‘तू परत ये’ हे गाणं आम्ही घेऊन आलो आहोत. आपलं जीवन सुरळीत व्हावं, म्हणून देवाला आर्जव करणारं हे गीत आहे. या गाण्याची संकल्पना माझा मित्र स्वरूप सावंत याची आहे.”

दिग्दर्शक स्वरूप बाळासाहेब सावंत म्हणतात, “सध्या लॉकडाऊनमूळे सगळ्यांना सक्तीने घरीच थांबावे लागतंय. त्यामूळे सगळेच आपले पूर्वीचे दिवस आठवतायत. मलाही माझे पूर्वीचे आयुष्य आठवताना माझ्या मनात सर्वांना बळ आणि उत्साह देणारं गाणं घेऊन यावं, अशी कल्पना सुचली. म्हणून मग मी माझे मित्र सचिन दुबाले पाटील आणि विष्णु घोरपडे यांना ही कल्पना ऐकवली. त्यांनाही ती आव़डल्याने त्यांनी या गाण्याची निर्मिती केली. या गाण्यातून आम्ही देवाला साकडं घालतोय की, तू परत ये, काही तरी चमत्कार कर आणि आमचे ते जुने दिवस आम्हांला परत दे.”

- Advertisement -

हे ही वाचा – ‘जग कोरोनाशी लढतय पण काही जण दहशतवाद पसरवत आहे’, मोदींचा ‘पाक’वर निशाणा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -