घरमनोरंजनमराठी नाटकाने रचला 'हा' नवा इतिहास...

मराठी नाटकाने रचला ‘हा’ नवा इतिहास…

Subscribe

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नवं मराठी नाटक 'Book My Show' या ऑनलाईन तिकीट बुकिंग साईटवर आणि या साईटच्या अॅपवर हे नाटक 'नंबर वन' ठरलं आहे.

प्रशांत दामले आणि कविता लाड या जोडीचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजतंय. काहीच दिवसांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने कमी वेळातच प्रेक्षकांची पसंती मिळवली. प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी गाजवलेल्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाचा पुढील भाग म्हणजेच  ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नवीन नाटक. दरम्यान, या नाटकाने मराठी नाटकाच्या इतिहासामध्ये एक नवा विक्रम रचला आहे. ‘Book My Show‘ या ऑनलाईन तिकीट बुकिंग साईटवर आणि या साईटच्या अॅपवर हे नाटक ‘नंबर वन’ ठरलं आहे. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसाद दिला असून, जवळपास सर्वच नाट्यगृहात या नाटकाचे ‘हाऊसफुल्ल’ प्रयोग होत आहेत. गेल्या १५ दिवसांपासू हे नाटक ‘बुक माय शो’वर सातत्याने पहिल्या क्रमांवर आहे. नाटकातील मुख्य कलाकार प्रशांत दामले यांनी त्यांच्या सोशल इतिहासात एक नवा विक्रम रचल्यामुळे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

- Advertisement -

साधारण २० वर्षांपूर्वी ‘एक लग्नाची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. प्रशांत दामले आणि कविता मेढेकर-लाड या जोडीने नाटकाला चारचांद लावले आणि बघता बघता या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं. नाटकातील जोडीसोबतच हिट ठरली या नाटकातील गाणी. ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘ही परी अस्मानीची’ या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आजही अनेक प्रेक्षकांच्या ओठांवर ही गाणी आहेत. आता याच नाटकाचा सिक्वेल असलेलं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे गोष्ट सध्या सुपरहिट ठरतं आहे. नाटकातील मुख्य पात्रं ‘मन्या’ आणि ‘मनी’ यांचं पुढे काय झालं, त्यांचा संसार आता कसा सुरु आहे? हे पाहण्याची उत्सुकता अनेक मराठी प्रेक्षकांना होती. त्यामुळेच या नटकाला संपूर्ण राज्यातून उदंड प्रतिसाद मिळतो आहे. नाट्यरसिकांकडून मिळत असलेल्या या तूफान प्रतिसादामुळेच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ने हा नवा विक्रम रचला असल्याची भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -