घरमनोरंजन'या' भेटीमुळे उर्मिलाची बकेट लिस्ट झाली पुर्ण

‘या’ भेटीमुळे उर्मिलाची बकेट लिस्ट झाली पुर्ण

Subscribe

नुकतीच उर्मिलाने बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितची भेट घेतली.माधूरी दीक्षितची भेट घेतल्यामुळे उर्मिलाची एक बकेट लिस्टमधली एक इच्छा पुर्ण झाली आहे.

प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची अशी एक बकेट लिस्ट असते. ती पुर्ण करण्यासाठी आपल्याला परिने प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. बकेट लिस्टमधील एखादी गोष्ट अगदी सहज पुर्ण होते तर एखाद्या गोष्टीसाठी वाट बघावी लागते. अशीच बकेट लिस्टमधील एक इच्छा अभिनेत्री उर्मिला कोठारेची पुर्ण झाली आहे. नुकतीच उर्मिलाने बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितची भेट घेतली.

माधूरी दीक्षितची भेट घेतल्यामुळे उर्मिलाची एक बकेट लिस्टमधली एक इच्छा पुर्ण झाली आहे. उर्मिलाने हा भेटीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, आणि तिची बकेट लिस्टमधील एक इच्छा पुर्ण झाल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

 माधुरी दीक्षितची निर्मीती असलेला चित्रपट १५ ऑगस्टच्या एका कार्यक्रमात उर्मिलाला माधुरी दीक्षितला भेटली. माधुरी दीक्षित निर्मित ‘१५ ऑगस्ट’ चित्रपटात उर्मिलाचा नवरा म्हणजेच अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यावेळी उर्मिलाने माधूरीबरोबर खूप गप्पा मारल्या आणि या आठवणी फोटोत कैद केल्या आहेत. या फोटोत अभिनेता आदिनाथ कोठारे, माधुरी दीक्षितचा नवरा श्रीराम नेने, माधुरी दीक्षित आणि उर्मिला दिसते आहे.

हा फोटो उर्मिलाने इन्स्टावर शेअर करत लिहीले आहे की, ‘माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली. माधुरी दीक्षितला भेटून खूप छान अनुभव मिळाला. माझ्या शालेय जीवनापासून माधुरीला लांबून भेटण्याचे माझे स्वप्न होते. मात्र ही संधी मला मिळाली. तिच्यासोबत मी हात मिळविला आणि गप्पाही मारल्या. ‘

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -