‘ब्लाऊज घाल नाही तर फ्लाइटमध्ये घुसू देणार नाही’, एअर लाइनच्या नियमावर भडकली ‘ही’ मॉडेल

तिचे कपडे पहा, ती फार सुंदर आणि क्यूट दिसत आहे. मात्र तरिही एअरलाइन स्टाफने तिच्या कपड्यांवरुन तिला रोकले आणि क्रॉप टॉपवर ब्लॉऊज घालण्यास सांगितले.

model olivia culpo slams american airlines after airline staff told her to ‘put a blouse on’
'ब्लाऊज घाल नाही तर फ्लाइटमध्ये घुसू देणार नाही', एअर लाइनच्या नियमावर भडकली 'ही' मॉडेल

माजी मिस यूनिवर्स आणि मॉडेल ओलिविया कल्पोला (olivia culpo)  अमेरिकन एअरलाइन्सवर (american airlines ) फार वाईट अनुभव आला.ओलिवियाने या अनुभवावर  नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर पोस्ट लिहित ओलिवियाने अमेरिका एअरपोर्ट झालेल्या झालेला प्रकार सांगितला. एअरलाइन्स स्टाफने ओलिवियाच्या कपड्यांवर आक्षेप नोंदवला. ओलिवियाने क्रॉप टॉप घातला होता. मात्र असे कपडे विमानात चालणार नाही असे म्हणत क्रॉप टॉपवर ब्लाऊज घाल असे तिला सांगितले गेले. ब्लॉऊज घाल नाही तर फ्लाइटमध्ये घुसू देणार नाही, अशी धमकी देखील तिला देण्यात आली. या सगळ्या प्रकारानंतर ओलिवियाने अमेरिका एअरलाइन्सवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ओलिवियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ओलिविया तिची बहिण औरोरा सोबत प्रवास करत होती. तेव्हा एअरलाइन कर्मचाऱ्यांनी माझे कपडे पाहून आम्हाला थांबवले. मी क्रॉप टॉप आणि बाइक शॉर्ट्स घातले होते. ओलिवियाच्या बहिणीने तिचा एक व्हिडीओ देखील शेअर केला त्यात ओलिविया फार सुंदर होती. त्यात तिने असे म्हटले आहे की, मी आणि ओलिविया काबो येथे जात होतो. तिचे कपडे पहा, ती फार सुंदर आणि क्यूट दिसत आहे. मात्र तरिही एअरलाइन स्टाफने तिच्या कपड्यांवरुन तिला रोकले आणि क्रॉप टॉपवर ब्लॉऊज घालण्यास सांगितले. आता तुम्हीच सांगा की हे किती चुकीचे आहे असा प्रश्न तिने केला.

 

एअरलाइन स्टाफने ओलिविया आणि तिच्या बहिणीशी प्रचंड हुज्जत घातली. त्यामुळे ओलिवियाने शेवटी क्रॉप टॉपवर हुडी घालून फ्लाइटमध्ये प्रवेश केला. त्याच वेळी ओलिविया सारखेच कपडे घातलेली एक महिला तिथे आली. मात्र तिला एअरलाइन स्टाफने रोकले नाही. तिला सहजपणे फ्लाइटमध्ये बसू दिले. मात्र ओलिवियाच्या बहिणीने त्या महिलेचा फोटो शेअर करुन हे किती बरोबर आहे असा प्रश्न केला. या प्रकारानंतर ओलिवियाची बहिणी सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत ही घटना सर्वांपर्यंत पोहोचवत आहे.


हेही वाचा – Bigg Boss 15: Tejasswi Prakashच्या कमेंटमुळे ढसाढसा रडला Pratik Sehajpal