घरताज्या घडामोडीViral Video: अनेक वर्षांनंतर 'मोहब्बतें' फेम जुगल हंसराज थिरकला 'आंखें खुली हो...

Viral Video: अनेक वर्षांनंतर ‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज थिरकला ‘आंखें खुली हो या हो बंद’ गाण्यावर

Subscribe

अभिनेता जुगल हंसराजला (Jugal Hansraj) ‘मासूम’ चित्रपटातील आयकॉनिक गाणं ‘लकडी की काठी, काठी का घोडा’ यामुळे ओळखले जाते. तसेच विक्सच्या जाहिरातीमधील थंडीने त्रस्त झालेला मुलगा म्हणजे जुगल हंसराज आजही सगळ्यांच्या आठवणीत आहे. जुगल मोठा झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत जास्त काम करू शकला नाही. परंतु शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायसोबत त्याचा ‘मोहब्बतें’ हा चित्रपट नक्कीच संस्मरणीय ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील दिसले होते. या चित्रपटातील जुगल सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जुगलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ‘मोहब्बतें’ चित्रपटातील ‘आंखें खुली हो या हो बंद’ या गाण्यावर जुगल हंसराज थिरकल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ एका सेटवरील असून यामध्ये जुगल आपली सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. सध्या जुगलच्या या व्हिडिओने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. कारण बऱ्याच वर्षानंतर जुगल प्रेक्षकांना दिसला आहे.

- Advertisement -

दरम्यान आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘मोहब्बतें’ चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला होता. यामधील जुगल हंसराज एक लोकप्रिय बालकलाकार होता आणि त्याने ‘मासूम’ आणि ‘कर्मा’ चित्रपटात काम केले होते. तसेच जुगल ‘कभी खुशी कभी गम’, ‘सलाम नमस्ते’ आणि ‘आजा नचले’ सारख्या चित्रपटात देखील काम केली आहे. जुगलने फक्त अभिनय न करता ‘प्यार इम्पॉसिबल’ चित्रपट दिग्दर्शित सुद्धा केला आहे.


हेही वाचा – मुंबई पोलिसांना Squid Gameची पडली भुरळ; स्क्विड गेमद्वारे शिकवले वाहतुकीचे नियम


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -