घरमनोरंजन'हर हर महादेव' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित; बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित; बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

Subscribe

'हर हर महादेव' ही केवळ गर्जना नव्हती तर ती छत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढणा-या मावळ्यांचा महामंत्र होता. समोरचा गनिम कितीही शक्तिशाली असो त्याला सळो की पळो करुन सोडण्यासाठीची उर्जा निर्माण करणारी, मावळ्यांना नवी उमेद देणारी शिवगर्जना म्हणजे हर हर महादेव.

ऐतिहासिक चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षक सुद्धा या चित्रपटांना उदंड प्रतिसाद देत आहेत. अशातच अभिजित देशपांडे यांचे दिग्दर्शन असलेला ‘हर हर महादेव’ (har har mahadev) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे (subodh bhave) चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने यातील इतर कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे. सोशल मीडियावरसुद्धा या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे त्यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मोशन पोस्टर मधून आणखी एका दमदार अभिनेत्याचा लुक प्रेक्षकांसमोर आला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच वेबसिरीजमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर (sharad kelkar). ‘हर हर महादेव’ या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची(bajiprabhu deshpande) दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. यावर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट झी स्टुडियोजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हे ही वाचा – यंदा बिग बॉसच्या घरात आहे स्पेशल माळा, पाहा संपूर्ण घर

- Advertisement -

‘हर हर महादेव’ ही केवळ गर्जना नव्हती तर ती छत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढणा-या मावळ्यांचा महामंत्र होता. समोरचा गनिम कितीही शक्तिशाली असो त्याला सळो की पळो करुन सोडण्यासाठीची उर्जा निर्माण करणारी, मावळ्यांना नवी उमेद देणारी शिवगर्जना म्हणजे हर हर महादेव. हाच हर हर महादेवचा महामंत्र जपत बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्दी जौहरच्या सैन्याविरुद्ध घोडखिंड लढवली आणि आपल्या प्राणाची आहूती देत घोडखिंड पावन केली. बाजीप्रभूंच्या याच लढवय्या करारी बाण्याची गाथा अतिशय भव्य दिव्य स्वरुपात ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा प्रत्यय आज प्रकाशित झालेल्या मोशन पोस्टरमधून आणि त्यातील संवादातून येत आहे. “जोवर तोफा ऐकू येणार नाहीत तोवर आई विंझाईची आण आहे मला, एकही गनीम ही खिंड पार करु शकणार नाही… हा शब्द आहे बाजीचा.” शरद केळकरच्या दमदार आवाजात हा संवाद ऐकताना अंगावर अक्षरशः शहारा आल्याशिवाय राहत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

- Advertisement -

या भूमिकेबद्दल बोलताना शरद केळकर म्हणाले की,“आपण लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांची, गनिमी काव्याच्या, त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या अनेक प्रेरणादायी कथा वाचत आलेलो आहे. बाजीप्रभुंच्या पावनखिंडीची वीरगाथा ही त्यापैकी एकच. बाजीप्रभू या व्यक्तिमत्वाबद्दल जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि स्वराज्याप्रती त्यांची असलेली कमालीची निष्ठा आणि प्रेम घोडखिंडीमध्ये त्यांनी केलेला पराक्रम हा आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असाच आहे. अशा बाजीप्रभुंची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो. ही गोष्ट तेवढ्याच प्रखरपणे आणि सच्चेपणाने प्रेक्षकांसमोर येण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि संपूर्ण टीमने अत्यंत मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना ही गोष्ट नक्कीच भावेल याबाबत माझ्या मनात शंका नाही.” अश्या शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा –  वेब सीरिजमधून भारतीय सैनिकांचा अपमान केल्याच्या प्रकरणात एकता कपूरविरोधात गुन्हा दाखल

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -