घरमनोरंजन'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील मुनमुन दत्ताचा जर्मनीमध्ये झाला अपघात

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील मुनमुन दत्ताचा जर्मनीमध्ये झाला अपघात

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच बबिताचा जर्मनीमध्ये अपघात झाला आहे. मुनमुन दत्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे.

मुनमुनने शेअर केली पोस्ट
मुनमुन दत्ताने 21 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या अपघाताबद्दल सांगताना तिने लिहिलंय की, एक छोटा अपघात जर्मनीमध्ये झाला आहे. माझ्या डाव्या गुडद्यावर जखम झाली आहे. मला माझी ट्रिप अर्धवट सोडून घरी परताव लागत आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुनमुन दत्ता जर्मनी ट्रिप आधी स्विझरलँडमध्ये देखील गेली होती. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ती जर्मनीला गेली होती. स्विझरलँडमधील अनेक सुंदर फोटो मुनमुनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोमध्ये मुनमुन खूप आनंदी दिसत आहे. परंतु आता झालेल्या अपघातामुळे तिला भारतात पुन्हा परतावं लागत आहे.

- Advertisement -

2004 पासून केली करिअरला सुरुवात
मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली होती. त्यानंतर 2004 मध्ये तिने टेलिव्हिजनवरील हम सब बाराती मधूल टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. त्यानंकर ती ‘मुंबई एक्सप्रेस’, ‘हॉलिडे’ आणि ‘ढिंचॅक एंटरप्राइज’मध्ये देखील दिसली होती. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये देखील काम केले आहे.

 


हेही वाचा :

कॉन्सर्टनंतर श्रेया घोषालचा गेला होता आवाज; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -