नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार नयनतारा-विग्नेशच्या लग्नाचा व्हिडीओ अल्बम

नयनतारा आणि विग्नेश शिवनने आपल्या लग्नाच्या व्हिडीओ अब्लमसाठी नेटफ्लिक्ससोबत डील केले असून या डीलच्या मोठ्या रकमेसाठी सही केली आहे.

साउथ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन येत्या ९ जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. याचं दरम्यान आता या प्रसिद्ध जोडीबाबत एक जबरदस्त बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश यांचं लग्न नेटफ्लिक्स सोबत डील करण्यात आले आहे. सूत्रांच्या मते, नयनतारा आणि विग्नेश शिवनने आपल्या लग्नाच्या व्हिडीओ अब्लमसाठी नेटफ्लिक्ससोबत डील केले असून या डीलच्या मोठ्या रकमेसाठी सही केली आहे.

नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नाचा व्हिडीओ अब्लम
सूत्रांच्या माहितीनुसार, नयनतारा आणि विग्नेश शिवनच्या लग्नाचा व्हिडीओ अब्लम एक्सक्लूसिवली शूट करून नेटफ्लिक्सवर प्रीमियर केले जाईल. ज्याची संपूर्ण जबाबदारी दिग्दर्शक गौतम सांभाळणार आहेत. दिग्दर्शक गौतम नयनताराच्या लग्नाच्या शूटला डायरेक्ट करतील. मात्र अजून याबाबत काही खुलासा करण्यात आला नाही. याआधी सुद्धा विक्की कौशल आणि कतरीनाचे लग्नाचे सुद्धा व्हिडीओ अब्लम अॅमेझोन प्राइमवर दाखवण्यात येईल. अशी अफवा समोर आली होती.

६ वर्ष डेटिंग केल्यानंतर नयनतारा आणि विग्नेश करणार लग्न


नयनतारा आणि विग्नेश शिवन गेल्या ६ वर्षापासून एकत्र आहेत. हे स्टार कपल गेल्या अनेकदिवसांपासून लिव इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहिले आहेत. येत्या ९ जूनला नयनतारा आणि विग्नेश विवाहबंधनात अडकणार आहेत. कुटुंबीय आणि मित्रपरिवारच्या उपस्थित दोघेही विवाहबंधनात अडकणार असून लग्नानंतर चेन्नईमधील ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत.


हेही वाचा :http://‘खतरों के खिलाडी 12’ चे शूटिंग सुरू होताच रोहित शेट्टीने मारली जबरदस्त एन्ट्री