घरमनोरंजननेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंग करणार टीव्हीवर पदार्पण

नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंग करणार टीव्हीवर पदार्पण

Subscribe

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि पती रोहनप्रीत सिंग यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गायक रोहनप्रीत सिंगने वेगवेगळ्या सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये भाग घेऊन करिअरची सुरुवात केली. 2020 मध्ये बॉलिवूड गायिका नेहा कक्करसोबत लग्न केल्यानंतर रोहनप्रीत सिंग लोकप्रिय झाला, पण त्याच्यासमोर नवीन आव्हानेही आली. तो अनेकदा नेहा कक्करचा नवरा म्हणून ओळखला जायचा, पण आता रोहनप्रीत सिंग त्याच्या करिअरमध्ये नवी सुरुवात करणार आहे. आता रोहनप्रीत टीव्हीवर पदार्पण करणार आहे आणि पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे.

एका रिपोर्टनुसार रोहनप्रीत सिंग हर्ष लिंबाचियासोबत ‘सुपरस्टार सिंगर 3’ रिॲलिटी सिंगिंग शो सह-होस्ट करणार आहे. हर्ष लिंबाचिया याआधी हा शो एकटाच होस्ट करत होता. तर दुसरीकडे, रोहनप्रीत सिंगची पत्नी नेहा कक्कर या शोला जज करणार आहे. रोहन आणि नेहा हे रिअल लाईफ कपल पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohanpreet Singh (@rohanpreetsingh)

- Advertisement -

 नेहा कक्कर बऱ्याच काळापासून वेगवेगळ्या सिंगिंग शोज जज करत आहे. भारतीय रिॲलिटी सिंगिंग शो ‘इंडियन आयडॉल’मध्ये ती अनेक वर्षांपासून जज आहे. या शोमध्ये नेहा कक्कर देखील स्पर्धक म्हणून आली होती. आता ब्रेकनंतर नेहा पुन्हा जजच्या भूमिकेत परतली आहे आणि ‘सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये जजची खुर्ची सांभाळण्यासाठी सज्ज झाली आहे.

रोहनप्रीत सिंगने वयाच्या 3 व्या वर्षी सिंगिंगचा प्रवास सुरू केला, जिथे त्याने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. 2007 मध्ये रिॲलिटी सिंगिंग शो ‘सा रे ग मा प लिटिल चॅम्प्स’चा तो फर्स्ट रनर अप होता. यानंतर, तो 2018 मध्ये ‘रायझिंग स्टार’ च्या सीझन 2 मध्येफर्स्ट रनर अप देखील बनला. यानंतर त्याने म्यूजिक इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -