घरमनोरंजनशेतकऱ्यांना पाठिंबा देणारा नवा सिनेमा, मेरे देश की धरती

शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा नवा सिनेमा, मेरे देश की धरती

Subscribe

शेतकऱ्यांविषयी कळवळा असणाऱ्या दोन इंजिनिअर तरूण आपल्या गावाचा कसा कायापालट करतात याची रंजक कथा या सिनेमातून पहायला मिळणार आहे.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. २३ डिसेंबर हा दिवस दरवर्षी किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून ‘मेरे देश की धरती’ या हिंदी सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. शेतकरी आणि शेती हे नातं अतूट आहे. मेरे देश की धरती या आगामी हिंदी चित्रपटाच्या मोशन टाईटल पोस्टर लाँचच्या माध्यमातून ‘कार्निव्हल मोशन पिक्चर्स’ शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवत आहे. हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांविषयी कळवळा असणाऱ्या दोन इंजिनिअर तरूण आपल्या गावाचा कसा कायापालट करतात याची रंजक कथा या सिनेमातून पहायला मिळणार आहे. समाजात बदल घडविण्यासाठी धडपडणारी तरुणाई काय करू शकते हे दाखवताना आपली सामाजिक बांधिलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे असा संदेश देणारा हा सिनेमा असणार आहे. मेरे देश की धरती या सिनेमाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची असून कथा नील चक्रवर्ती यांची आहे. मेरे देश की धरती या सिनेमातून प्रबोधनासोबत प्रेक्षकांना नक्कीच एक चांगली कलाकृती पाहण्यास मिळेल असा विश्वास कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ आणि संचालिका वैशाली सरवणकर व्यक्त केली आहे.

- Advertisement -

वैशाली सरवणकर यांची या सिनेमाची निर्मिती केली आहे. फराझ यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून विक्रम यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. दिव्यांदू शर्मा, अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका हे कलाकार आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे  ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.


हेही वाचा – यंदाच्या इफ्फी फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या ‘प्रवास’ची बाजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -