Bisexual असणार नवा Superman!

New Superman in upcoming DC Comics comes out as bisexual
Bisexual असणार नवा Superman!

लहानपणापासून आपण सुपरमॅनला पाहत आलो आहोत. सुपरमॅन एक असा सुपरहिरो आहे, ज्याचे नाव घेताच एक उंच शक्तीशाली व्यक्ती डोळ्यासमोर दिसतो. ज्यांनी सुपरमॅनच्या सीरिज पाहिल्या आहेत किंवा त्याच्याबद्दल वाचलं आहे, त्यांच्यासाठी तो अविस्मरणीय आहे. पण आता येणाऱ्या काळात सुपरमॅन पूर्णपणे वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे.

सुपरमॅन आता बायसेक्युअल (Bisexual) होणार आहे. हो हे खरं आहे. आपल्याला आवडणारा सुपरहिरो म्हणजेच सुपरमॅन आता बायसेक्युअल अंदाजात दिसणार आहे. परंतु असा सुपरमॅन पडद्यावर नाही तर कॉमिक बुकमध्ये दिसणार आहे. डीसीच्या कॉमिकचा लोकप्रिय सुपरहिरो आता नव्या आवृत्ती (एडीशन) मध्ये बायसेक्युअल होणार आहे. तसेच या कहाणीमध्ये एक ट्विस्टपण पाहायला मिळणार आहे.

डीसी कॉमिक सीरिजच्या पाचव्या अंकात ‘सुपरमॅन सन ऑफ केल-एल’मध्ये नवा सुपरमॅन म्हणजेच क्लार्क केंट आणि लेनचा मुलगा जॉन केंट एक बायसेक्युअल दाखवला आहे. त्याला एका पुरुष रिपोर्टर जे नाकामुरावर प्रेम होते. आता डीसी या दोघांची केमिस्ट्री कशी पुढे नेईल हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

सध्या कॉमिक बुकच्या येणाऱ्या एडीशनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉमिक बुकच्या फोटोवर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकं या काल्पनिक कहाणीत झालेल्या बदलला समर्थन करत आहेत, तर काही जण याचा विरोध करत आहेत. माहितीनुसार कॉमिक बुकची येणारी कहाणी मागील कहाणीला पुढे नेत आहे.


हेही वाचा – Viral Video: देवीच्या मंडपात नातेवाईकांना पाहताच काजोलला रडू कोसळले