Covid-19 Rules : १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान प्रवासावरील निर्बंध उठणार

Government removes restrictions on domestic flights, allows to operate at 100% capacity from Oct 18
आजपासून देशांतर्गत विमानांचे उड्डाण १०० टक्के प्रवासी क्षमतेने होणार

देशात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने केंद्र सरकारने आता देशांतर्गत विमान प्रवासावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशांतर्गत विमान प्रवासावरील प्रवासी क्षमतेचे निर्बंध शिथील झाले आहेत. देशात आता १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान वाहतूक संपूर्ण प्रवासी क्षमतेने होणार आहे.

नागरी उड्डान मंत्रालयाच्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत व्यावसायिक विमान उड्डाणातील प्रवाशांच्या आसन क्षमतेसंदर्भात निर्बंध उठवले जाणार आहे. त्यामुळे विमान उड्डाण हे संपूर्ण आसन क्षमतेने होणार आहे. सध्या देशांतर्गत विमान वाहतूक प्रवासी क्षमतेच्या ८५ टक्के क्षमतेने सुरु आहे. परंतु आता प्रवासी क्षमतेवर असलेले निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले आहेत.

सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने देशांतर्गत विमान उड्डाणातील प्रवासी क्षमता ७२.५ टक्क्यांवरून ८५ टक्क्यांपर्यंत केली. यापूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जुलैमध्ये देशांतर्गत विमान उड्डाणातील प्रवासी क्षमता ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवली.

कोरोनामुळे देशात २३ मार्च २०२० पासून नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्याच आली होती. परंतु मे २०२० पासून वंदे भारत मिशनतंर्गत विशेष आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण सुरु करण्यात आले. याशिवाय काही ठरावीक देशांसह द्विपक्षीय एअर बबल कराराच्या माध्यमातून जुलै २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण सुरु करण्यात आले.


Maharashtra New Guidelines: सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा संपूर्ण नियम