घरमनोरंजनप्रियांकासाठी निक झाला रोमिओ; वॅंगो-टॅंगो कॉन्सर्ट

प्रियांकासाठी निक झाला रोमिओ; वॅंगो-टॅंगो कॉन्सर्ट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. निक प्रियांकासाठी काहीही करण्यास तयार असतो. यावेळीही त्याने प्रियांकासाठी विशेष गोष्ट केली आहे.

कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर रविवारी रात्री नाइट आऊटसाठी बाहेर पडलेल्या प्रियांका आणि निक जोनासचा रोमिओ ज्युलिएटचा अंदाज त्यांच्या चाहत्यांना नक्कीच भावला असणार. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरीकन गायक निक जोनास यांचे मागील वर्षी लग्न झाले. तेव्हापासून ही प्रियांका-निकची जोडी विविध समारंभ, पार्ट्यांमध्ये त्यांच्या हटक्या अंदाजामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत.

रोमिओ-ज्युलिएट आणि ‘ती’

रविवारी रात्री कॅलिफोर्निया येथील आय हार्ट रेडिओतर्फे वॅंगो- टॅंगो कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टमध्ये निक जोनासने त्याचे भाऊ जो जोनास आणि केविन जोनास यांसह सादरीकरण केले. यावेळी नेहमीप्रमाणेच प्रियांका निकसोबत दिसली. यावेळी निकने प्रियांकासाठी रोमिओचा अवतार घेतल्याचे प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोजमधून दिसते. या फोटोमध्ये निक- प्रियांकाने शेक्सपिअरच्या रोमिओ-ज्युलिएटमधील एक प्रसंद सादर केला आहे. या प्रसंगात निक, एका बाल्कनीत हातात कप घेवून उभा असून प्रियांका बाल्कनी खाली उभी राहून, वर तोंड करून त्याच्याकडे बघत आहे. या फोटोखाली प्रियांकाने एक कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमध्ये तिने ‘रोमिओ ओ रोमिओ… अॅण्ड अवा ड्य्रू नाइट आउट’ असे म्हटले आहे.

- Advertisement -

निकनेसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या नाइट आउटचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये निक आपल्या भावंडांबरोबर संगीत, नृत्याचा आस्वाद घेत आहे.

- Advertisement -

प्रियांका दिसणार ‘द स्काय इज पिंक’ मध्ये

प्रियांका लवकरच सोनाली बोसच्या स्काय इज पिंकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबर फरहान अख्तर, झायरा वसिम, रोहित सराफ अशी कलाकार मंडळी असणार आहेत. फुफ्फुसाच्या आजारावर मात केलेल्या आयेशा चौधरीची प्रेरणादायी कथा या चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -