Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन निक्की तांबोली झाली भावूक! म्हणाली, "मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की....

निक्की तांबोली झाली भावूक! म्हणाली, “मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की….

आपण खतरों के खिलाडीमध्ये भाग घ्यावा ही तिच्या भावाची इच्छा होती. त्यामुळे आपल्या भावासाठी आणि परिवारासाठी मी या शोमध्ये भाग घेत असल्याचं तिने स्पष्ट केलंय.

Related Story

- Advertisement -

बिग बॉस फेम निक्की तांबोळीचा भाऊ जतीन तांबोळी याचे नुकतेच कोरोना संसर्गाने निधन झाले. त्याच्या मृत्यूमुळे निक्कीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. निक्की आता आणखी एका नव्या टास्कसाठी तयार आहे. ती आता ‘खतरों के खिलाडी ११’ च्या शूटिंगमध्ये भाग घेण्यासाठी केपटाऊनला रवाना झाली आहे. केपटाऊनला जाताना तिने भाऊ आकाशचा एक फोटो शेअर करत ”मी आता तुला पाहू शकत नाही” अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रडण्याचा इमोजीही तिने टाकला आहे.निक्की तांबोळी आपल्या भावाच्या निधनाने प्रचंड दु:खी असल्याचं सांगितलं जातंय. तिने या आधीच सांगितलं आहे की, आपण खतरों के खिलाडीमध्ये भाग घ्यावा ही तिच्या भावाची इच्छा होती. त्यामुळे आपल्या भावासाठी आणि परिवारासाठी मी या शोमध्ये भाग घेत असल्याचं तिने स्पष्ट केलंय. निक्कीला तिच्या पालकांचीही चिंता सतावत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

निक्की तांबोळीने या शोमध्ये भाग घेण्यापूर्वी एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. ती म्हणते की, “मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की एकीकडे माझा परिवार आहे जो या दु:खातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहे तर दुसरीकडे मी माझ्या करियरच्या उंचीवर आहे.” अशा प्रकारची भावनिक पोस्ट निक्कीने शेअर केली आहे.


- Advertisement -

हे वाचा-  नागपुर ते हैदराबाद एयरलिफ्ट केलेल्या कोरोनारुग्ण भारतीच्या निधनानंतर सोनू सुदने व्यक्त केलं दुख:

- Advertisement -