घरमनोरंजनजुन्या नात्याची नवीन गोष्ट

जुन्या नात्याची नवीन गोष्ट

Subscribe

आई आणि मुलीचं नातं.. त्यांच्यात जनरेशन गॅपमुळे निर्माण होणारे प्रश्न, त्यामुळे त्यांच्यात होणारी भांडणं हे चित्रपटासाठीचे विषय प्रेक्षकांसाठी आता नवीन नाहीयेत. ‘माधूरी, वय विचारू नका’ हा चित्रपटही याच पठडीतला पण एका वेगळ्या पध्दतीने चित्रपटाची लेखिका, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांनी सगळ्यांसमोर आणला आहे. साधारणतः टीझर बघून नेमका हा चित्रपट कसा असेल याची कल्पना आपल्याला येते. आजपर्यंत कधीही न पाहलेल्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी आपल्याला या चित्रपटात दिसते. पण हे वेगळेपण जपताना थोडा ओव्हरडोस होतो.

माधुरी प्रधान (सोनाली कुलकर्णी) आणि तिची मुलगी काव्या (संहिता जोशी) हे पाचगणीच्या आपल्या घरात दोघीच रहात असतात. अतिशय कडक शिस्तीची, कॉलेजमध्ये प्रोफेसर असणारी माधुरी काव्यालाही आपल्या धाकात वाढवते. काव्या आता 18 वर्षाची झालीये. आता तीला माधुरीची ही बंधन नकोशी वाटायला लागतात. एकेदिवशी काव्या आपल्या आईला कंटाळून हॉस्टेलवर जाण्याचा निर्णय घेते. त्यादिवळी काव्या घरीही येत नाही ती रात्र आपल्या मनासारखी जगण्याचा निर्णय ती घेते, आणि दुसर्‍या दिवशी सकाळी घरी आल्यावर तीला कळतं की आपल्या आईला रेट्रोग्रेड अमेझिया नावाचा आजार झालेला असतो. या आजारात रूग्ण आपलं वय विसरतो. असच काहीसं माधुरीच्या बाबतीतही होतं. माधूरी स्वत:ला 20 वर्षाची समजू लागते. आता काव्या तीची आई होते. यावेळी काव्यासोबत तीचा बॉयफ्रेंड अमर (विराजस कुलकर्णी), माधुरीचा विद्यार्थी गुगल (अक्षय केळकर), आणि माधुरीची ट्रीटमेंट करणारा डॉक्टर तुषार (शरद केळकर) यांनाही माधुरीला समजून घ्यावं लागतं.

- Advertisement -

माधुरी स्वत:ला 20 वर्षाची समजत असल्यामुळे काव्या आपली मुलगी आहे हेच ती विसरून जाते. ती एखाद्या कॉलेजमधल्या मुलीसारखी वागू लागते. यावेळी काव्या ज्याप्रमाणे पूर्वी माधुरी जशी काव्याची काळजी घेते. तशी माधुरीची काळजी घेते. या दरम्यान ज्या मायलेकींमध्ये अजिबात पटत नसतं, त्याच दोघी आता एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड बनतात. आता पुढे माधुरीला मागचं सगळं आठवतं का? काव्याचे आपल्या आईबद्दलचे गौरसमज दूर होतात का? हे कळण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल.

संहिता जोशीचा हा पदापर्णातील चित्रपट आहे. संहिताने आपल्यापरीने ही भुमिका निभावण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आजपर्यंत कधीही न केलेली भुमिका या चित्रपटात केली आहे. मात्र काही ठिकाणी ही भूमिका ओव्हर झाल्यासारखी वाटते. पण काव्या आणि माधुरीमधलं बॉण्डींग उत्तम जुळून आलं आहे. तर अक्षय केळकर, विराजस कुसकर्णी या दोघांनीही आपल्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. पण चित्रपटात सातत्याने येणार्‍या काही दृष्यांचा नंतर कंटाळा येतो. गुगलच्या सतत तोंडी असणारी टक्केवारीची भाषा कंटावाणी होते. काव्याच्या सतत चिडून बोलण्याचाही त्रास व्हायला लागतो. असे काही प्रसंग वगळता चित्रपट जमून आला आहे. मध्यंतरापर्यंत चित्रपट फारसा पकड घेत नाही. त्यामुळे काहीसा कंटाळवाणा होतो पण मध्यंतरानंतर चित्रपटाला वेग आला आहे.

- Advertisement -

विषय जरी नेहमीचा असला तरी तो वेगळ्या प्रकारे मांडण्यात यशस्वी झाला आहे. चित्रपटातील ‘के सरा…हे गाणं चित्रपटानंतरही तुमच्या लक्षात राहतं. अर्थात याच श्रेय संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांना जातं. हा चित्रपटलाही उत्तम लोकेशन्स मिळाले आहेत. एकंदरीतच कथा, विषय जरी जुनाच असला तरी त्याची मांडणी मात्र वेगळ्या प्रकारे चित्रपटात करण्यात आली आहे. त्यामुळे एकदा हा चित्रपट बघायला काहीच हरकत नाही.

-संचिता ठोसर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -