Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन World Music Day: फॅमिली मॅनचा अथर्व यशराज मुखाते कडून घेतो संगिताचे धडे,...

World Music Day: फॅमिली मॅनचा अथर्व यशराज मुखाते कडून घेतो संगिताचे धडे, बघा व्हिडिओ

Related Story

- Advertisement -

‘द फॅमिली मॅन’मध्ये मनोज बाजपेयी आणि प्रियामणि यांचा मुलगा अथर्व यांची भूमिका साकारणारा लोकप्रिय बाल अभिनेता वेदांत सिन्हा यांनी आज जागतिक संगीत दिनानिमित्त आपल्या संगीत कौशल्यांचे त्याने सादरीकरण केले. यावेळी प्रेक्षकांनी वेदांतचा चांगला प्रयत्न पाहून त्याचे कौतुक केले. या तरूण संगीत प्रेमीने कोणतेही शिक्षण न घेता किंवा कोणताच प्रयत्न न करता सूर निर्माण करण्याता अविरत प्रयत्न केला. दरम्यान, आता त्याने प्रतिभावान संगीतकार यशराज मुखाते यांच्याकडून गिटारचे धडे देखील गिरवले.

- Advertisement -

यशराजने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, वेदांत नवीन शिक्षकांकरिता गिटारवर सूर लावताना त्याच्या कौशल्यांचे सादरीकरण करताना तुम्हाला दिसू शकतो. त्यानंतर यशराजने या व्हिडिओला उत्कृष्ट नमुना म्हणून रूपांतरित केले.

बघा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

- Advertisement -

राज आणि डीके दिग्दर्शित ‘द फॅमिली मॅन २’ चा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर दुसर्‍या सिझन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यामध्ये श्रीकांतची मुख्य भूमिका साकारणाऱ्या मनोज बाजपेयी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, या वेबसिरीज कथा सज्ज आहे, पण तिसरा सिझन येण्यास जवळ जवळ दोन वर्षे लागतील. या सिरीजमध्ये समांथा अक्किनेनी, शरद केळकर, शरिब हाश्मी, श्रेया धनवंतरी, सनी हिंदुजा, शहाब अली आणि अशलेषा ठाकूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.  दरम्यान, एकेकाळी अभियांत्रिकीचा अभ्यास करणार्‍या यशराजने ‘साथ निभाना साथिया’ या सीनवरील त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडीयावर एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -