घरमनोरंजनतुम्ही तुमचे भारतीय राष्ट्रीयत्व... पाकिस्तानी अभिनेत्याने केलं प्रियंका चोप्राला ट्रोल

तुम्ही तुमचे भारतीय राष्ट्रीयत्व… पाकिस्तानी अभिनेत्याने केलं प्रियंका चोप्राला ट्रोल

Subscribe

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रियंकाने बॉलिवूडबाबत अनेक मोठे खुलासे केले होते. ज्यावर अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली होती. दरम्यान, आता एका पाकिस्तानी कलाकाराने प्रियंकाला ट्रोल केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने प्रियंकाला टॅग करत तिच्यावर टीका करत आहे. खरं तर, प्रियंकाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी दिग्दर्शक शर्मीन ओबेद चिनॉय यांना कलर्सची पहिली महिला आणि स्टार वॉर्स चित्रपट दिग्दर्शित करणारी पहिली महिला झाल्याबद्दल अभिनंदन केले होते. यावेळी प्रियंकाने लिहिले होते की, “कलर्सची पहिली व्यक्ती आणि स्टार वॉर्स चित्रपट दिग्दर्शित करणारी पहिली महिला आणि ती दक्षिण आशियाई आहे. शर्मीन ओबेद चिनॉय हा किती ऐतिहासिक क्षण आहे. मला तुझा खूप अभिमान आहे.”

- Advertisement -

यावेळी शर्मीन ओबेद चिनॉयला दक्षिण आशियाई म्हटल्यामुळे पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने प्रियंकाला ट्रोल केलंय. त्याने तिच्यावर टीका करत लिहिलंय की, “प्रियंका चोप्रा, तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की शर्मीन ओबेद चिनॉय पाकिस्तानी आहे. अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही दक्षिण आशियाई असल्याचा दावा करण्यापूर्वी जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही तुमचे भारतीय राष्ट्रीयत्व दाखवता,” असं अदनान सिद्दीकीने म्हटलं आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

साऊथचा पृथ्वी अंबर झळकणार मराठी चित्रपटात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -