घरमनोरंजनसहभाग सेलिब्रिटींचा, उत्सव लहान मुलांचा

सहभाग सेलिब्रिटींचा, उत्सव लहान मुलांचा

Subscribe

अभिनेते धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, जयाप्रदा, ग्रेसी सिंग, राहुल देव, सोनाली कुलकर्णी, पुनित इस्सार, सिद्धार्थ जाधव या सेलिब्रिटींची नावे वाचल्यानंतर हा कोणता तरी मोठा सोहळा आहे असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर या शाळेचा जो वार्षिक महोत्सव असतो, त्यासाठी हे सेलिब्रिटी कलाकार एकत्र आले होते. पाहुणे कलाकार म्हणून त्यांना निमंत्रित केले असले तरी ज्या विद्यार्थ्यांनी आपलं कर्तृत्त्व सिद्ध केलेलं आहे, गुणवत्ता दाखवलेली आहे, अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान या कलाकारांच्या हस्ते करण्यात आला. यंदा या शाळेच्या महोत्सवाचे 38 वे वर्ष होते. शाळेचे मुख्याध्यापक अजय कौल यांनी हा देखणा सोहळा घडवून आणला होता.

प्रत्येकवर्षी सामाजिक, राजकीय व्यक्तींना प्राधान्य देताना सेलिब्रिटी कलाकारांना मोठ्या संख्येने आमंत्रित केल्याने फक्त गर्दीच होत नाही तर यानिमित्ताने मुलांच्या अपेक्षाही उंचावल्या जातात. एका सामाजिक कार्याला प्रेरणा देणे हाही या मागचा उद्देश असतो. गेल्यावर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते एकता या सामाजिक काम करणार्‍या संस्थेची स्थापना केली. त्याचा परिणाम असा झाला की, मोफत पोळीभाजी हा उपक्रम यानिमित्ताने सुरू झाला. नृत्य, गायन सोबतीला भव्यदिव्य पुरस्कार सोहळे आयोजित केल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. महाबळेश्वरला अपघाताने कोणीतरी दरीत पडल्याचे अनेकवेळा ऐकायला मिळते. आपला स्वत:चा जीव धोक्यात टाकून अशा व्यक्तींना शोधण्याचे, वाचवण्याचे काम ज्या ट्रॅकर ग्रुपच्यावतीने केले जाते, त्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -