Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन पावरी ट्रेंडींगमध्ये पण,स्मृती इराणींची 'त्वाडा कुत्ता टॉमी'लाच पसंती

पावरी ट्रेंडींगमध्ये पण,स्मृती इराणींची ‘त्वाडा कुत्ता टॉमी’लाच पसंती

पाकिस्तानच्या मूलीचा व्हिडिओ पाहण्यापेक्षा शहनाज गिलचा व्हिडिओ पाहण्याचे आवाहन सोशल मिडियाद्वारे केले आहे.

Related Story

- Advertisement -

हल्ली सोशल मिडियावर मीमद्वारे अनेक गोष्टी ट्रोल होतात. त्यापैकीच ‘त्वाडा कुत्ता टॉमी’ आणि ‘पावरी’ या दोन व्हिडिओबद्दल केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या मूलीचा व्हिडिओ पाहण्यापेक्षा शहनाज गिलचा व्हिडिओ पाहण्याचे आवाहन सोशल मिडियाद्वारे केले आहे. स्मृती इराणी यांनी शहनाजची बाजू घेत प्रतिक्रिया दिली असून त्वाडा कुत्ता टॉमीला पसंती दिली.

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकांमधून चाहत्यांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री आणि केंद्रिय मंत्री या सोशल मिडियावर नेहमीच अॅक्टीव असतात. त्यामुळे काही दिवसांपासून सोशल मिडियावरील ‘पावरी होरी है’ हा ट्रेंड त्यांनी पाहिला. हा व्हिडिओ दानानीर मोबीन नामक एका पाकिस्तीनी मुलीचा आहे. त्यात ती मित्रांबरोबर पार्टी करताना दिसत आहे. कोकीलाबेन यांचा रसोडे में कौन था, बिग बॉसमधील शहनाज गिलचा त्वाडा कुत्ता टॉमी अशा अनेक डायलॉगवर मीम बनवणारा संगीत निर्माता, युट्यूबवर यशराज मुखाते यांनी या मुलीच्या ‘पावरी होरी हैं’ या व्हिडिओवर देखील एक मीम तयार केलं आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यावरच त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

- Advertisement -

स्मृती इराणी यांनी शहनाजच्या ‘त्वाडा कुत्ता टॉमी’ या व्हिडिओला शेअर करत म्हटलं आहे की, तुम्ही पावरीपेक्षा टॉमीला प्राथमिकता द्या. मला माहित आहे मी या विषयावर खूप उशीरा बोलतं आहे, पण ‘देर आये दुरुस्त आये’ याप्रमाणे मी माझं मत मांडत आहे. पावरीपेक्षा आणि शहनाज गिलच्या भावना बघा. टॉमी, दर्द, दुःख, आंसू, फिलिंग… शहनाज पंजाबी किंवा कोणत्याही भाषेत बोलू शकते. तिने जे म्हटलं त्यावर भांगडादेखील करता येऊ शकतो. मी हे कसं विसरू शकते.’ असं म्हणत त्यांनी शहनाज आणि यशराजला टॅग केलं आहे.


हेही वाचा – १ मार्च ते २८ मार्च पर्यंत होणार राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन?

- Advertisement -