घरमनोरंजनअनुराग कश्यप यांच्यावर आरोप करणाऱ्या पायल घोषची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल

अनुराग कश्यप यांच्यावर आरोप करणाऱ्या पायल घोषची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल

Subscribe

फिल्ममेकर अनुराग्य कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोष हिच्या ट्विटची राष्ट्रीय महिला आयोगाचे दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री पायल घोष यांनी अनुराग कश्यपवर २०१५ साली करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाबाबतचे ट्विट पाहिले. पायल यांनी आणि रितसर तक्रार पाठवावी, त्यानंतर आम्ही पोलिसांपर्यंत हे प्रकरण नेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे ट्विट एएनआयने दिले आहे. तर पायल घोष हिनेदेखील व्हिडिओच्या माध्यमातून आपबिती सांगितले आहे.

काय म्हणाली पायल घोष 

त्यांनी मला अस्वस्थ केले. मला त्याबद्दल वाईट वाटले, जे काही घडले ते होऊ नये. जर कोणी तुमच्याकडे कामासाठी येत असेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कशासाठीही तयार आहे. मी त्यांना ओळखतही नव्हते, आमची मैत्री नव्हती. फक्त कामासाठी मी भेटायला गेले होते, जे घडले ते चुकीचे होते, असे पायलने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हिने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. पायलने ट्विट करत अनुरागवर हे आरोप केले असून सोबतच एका मुलाखतीचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. तसेच तिने याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही केली आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा, असे पायलने ट्विट करत म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

गोवा बॉम्बस्फोट प्रकरणात सनातनच्या ६ सदस्यांची निर्दोष मुक्तता; ४ आरोपी अद्याप फरार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -