घरमनोरंजनप्रियदर्शन जाधवच्या 'लव सुलभ' चे पोस्टर लॉंच, चित्रिकरणालाही सुरुवात

प्रियदर्शन जाधवच्या ‘लव सुलभ’ चे पोस्टर लॉंच, चित्रिकरणालाही सुरुवात

Subscribe

प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित लव सुलभ या चित्रपटाचे पोस्टर लॉंच झाले असून या चित्रपटाच्या चित्रिकरणालाही सुरुवात झाली आहे.

अभिनेता-लेखक-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळला आहे. प्रियदर्शन ‘लव सुलभ’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेवून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत: प्रियदर्शनने सांभाळली असून प्रभाकर परब यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच सोशल मीडियाद्वारे लॉंच करण्यात आले आहे. या पोस्टरवर मेहंदी असलेल्या हातावरील बोटांत अंगठी आहे आणि त्या हातानं भिंतीवर स्त्री-पुरुषाची आकृती काढलेली दिसते मात्र या चित्रपटाचा आशय हा अजूनही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे

- Advertisement -

‘लव सुलभ’ हे चित्रपटाचे नाव अतिशय आकर्षक असले तरी या नावातून ही एक प्रेमकथा असेल असा अंदाज बांधता येतो. विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रियदर्शन जाधव लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी पार पाडणार आहे. या चित्रपटात प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते यात प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. चित्रपटाचे छायांकन केदार गायकवाड करणार आहेत,तर सतीश चिपकर कलादिग्दर्शक म्हणून दिसणार आहेत. ठाणे येथे या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली असून ठाण्याचे महापौर नरेशजी म्हसके आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. यावेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ ही उपस्थित होते. एकंदरीत या चित्रपटाचे नाव स्टारकास्ट आणि पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.


हे वाचा- ‘फॅमिली मॅन २’ च्या प्रदर्शनाबाबत निर्मात्यांची मोठी घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -