घरटेक-वेक...नाहीतर तुमचं व्हॉट्सअप होणार बंद

…नाहीतर तुमचं व्हॉट्सअप होणार बंद

Subscribe

iPhone 4 आणि iPhone 4s या आयफोन्समध्ये व्हॉट्स App सपोर्ट करणार नाही.

भारतात मोठ्या प्रमाणात व्हॉट्स App युझर्स आहेत. व्हॉट्स App ने काही दिवसांपूर्वी काही नव्या पॉलिसी आणल्या आहेत. त्यावरुनही व्हॉट्स App वापरायचे की नाही, व्हॉट्स App ने दिलेल्या अटी मान्य करायच्या की नाही असे अनेक प्रश्न युझर्सना पडले होते. व्हॉट्स App प्रायव्हसी पॉलिसीचा मुद्दा संपत नाही तोवर आता व्हॉट्स App हे फेसबुकचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आता काही फोनमध्ये सपोर्ट करणे बंद करणार आहे. व्हॉट्स App बिटाच्या 2.21.50 व्हर्जन iOS 9 आणि त्यापूर्वीचे सपोर्ट करणारे डिव्हाईस आता सपोर्ट करणे बंद करणार आहे, अशी माहिती व्हॉट्स App ट्रॅकर WABetaInfoच्या रिपोर्टने दिली आहे.

बाजारात iPhone 5 हा शेवटा आयफोन आहे. या आयफोन सध्या व्हॉट्स App सुरु आहे. त्यामुळे आता iPhone 4 आणि iPhone 4s या आयफोन्समध्ये व्हॉट्स App सपोर्ट करणार नाही. तर अँड्रॉईड फोनमध्ये व्हर्जन 4.0.3 आणि त्यानंतरच्या अँड्रॉईवर फोनवर व्हॉट्सApp सपोर्ट करत आहे.

- Advertisement -

व्हॉट्स App आणणार नवीन आर्काइव्ह फिचर

व्हॉट्स App नेहमीच युझर्सना नव नवीन फिचर्स देत असते. व्हॉट्स App लवकरच आर्काइव्ह चॅट्स हे नवीन फिचर आणणार आहे. सध्या या फिचरच्या डेव्हलपमेंटचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्स App यूजर इंटरफेसवर काम करत आहेत. या यूजर इंटरफेसमुळे युझर्सना आर्काइव्ह चॅट पाहता येणार आहे. हे आर्काइव्ह थोडेफार इन्स्टाग्राम आर्काइव्ह सारखे असणार आहे. युझर्सना आर्काइव्ह चॅट्सचे नोटिफिकेशन येणार नाही. आर्काइव्ह चॅट्स या ऑप्शनमध्ये जाऊन युझर्सना ते पहावे लागणार आहे.


हेही वाचा – आता FB वर मिळणार Tiktok व्हिडिओचा आनंद; Facebook Reels फीचर लाँच

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -