घरमनोरंजन'या' कारणाने प्रीति झिंटाने सोडले बॉलिवूड, केला खुलासा

‘या’ कारणाने प्रीति झिंटाने सोडले बॉलिवूड, केला खुलासा

Subscribe

मी सिनेसृष्टीपासून दूर गेले कारण स्वतःची विक्री केली नाही

बॉलिवूडची डिंपल क्वीन म्हणून प्रचलित असलेल्या प्रीति झिंटाने बॉलिवूड किंग शाहरुख खानसोबत ‘दिल से’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात प्रीति झिंटची भूमिका छोटी होती. परंतु या छोट्याशा भूमिकेत तिने चाहत्यांचे मन जिंकले होते. ‘माय दिल गोज हम्म्म’ ते पिया पिया पर्यंत गाण्यांमधून तिने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली होती. प्रीति झिंटा बड्या अभिनेत्र्यांपैकी एक होती. परंतु आता तिला मोठ्या पडद्यावर पाहून बराच काळ उलटला आहे. प्रीति झिंटा स्वतःला का मोठ्या पडद्यापासून का दूर गेली याचे कारण आता प्रीति झिंटाने दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रीति झिंटा बॉलिवू़डपासून दुर आहे. यावर प्रीतीने म्हटले आहे की, मी स्वतःची विक्री करत नाही. यामुळेच सिनेसृष्टीतून स्वतःच दूर झाली आहे. असे एका मुलाखतीत प्रीति झिंटाने म्हटले आहे.

प्रिती पुढे म्हणाली की, मी कोणत्याही गोष्टीची तक्रार करेल अशी व्यक्ती नाही. म्हणून मला कोणाविरुद्ध तक्रार नाही करायची. मी सिनेसृष्टीपासून दूर गेले कारण स्वतःची विक्री केली नाही. मी करत असलेल्या कामाबद्दल मला कौतुक आहे. असे प्रीति झिंटाने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

- Advertisement -

प्रीति झिंटा सध्या अमेरिकेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रीतीचे आई, भाऊ, वहिणी, मुले आणि काका यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. याबाबत तिने सांगितले की, तीन आठवड्यांपूर्वी घरातील व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला होता. अचानक व्हेंटिलेटर, आयसीयू आणि ऑक्सिजन मशीन सारख्या शब्दांचा नवीन अर्थ समोर आला. अमेरिकेत मला असहाय्य वाटले होते. परिवारातील व्यक्तींनी कोरोनाविरोधात संघर्ष जिंकला असल्याचे तिने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिलं होते.

प्रीति झिंटाने आपल्या चाहत्यांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोना विषाणू हा धोकादायक असल्याचेही तिने सांगितले आहे. त्यामुळे काळजी घ्या, फेसमास्क वापरा, आणि सामाजिक अंतर पाळण्याचेही आवाहन प्रीति झिंटाने आपल्या चाहत्यांना केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -