Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग Video: प्रिया वारियरने पुन्हा मारला डोळा; चाहते झाले पुन्हा घायाळ

Video: प्रिया वारियरने पुन्हा मारला डोळा; चाहते झाले पुन्हा घायाळ

प्रिया प्रकाशच्या 'विंक और फायर गन' च्या इशारे आणि हावभावांनी सोशल मीडियावर मिळवली होती प्रचंड लोकप्रियता

Related Story

- Advertisement -

आपल्या चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या हावभावांनी अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी प्रिया प्रकाश वारियर Priya Prakash Varrier पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना घायाळ करायला येणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर दिसतेय. ‘ओरू अदार लव’ या मल्याळम चित्रपटाची अभिनेत्रीने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रियाने पुन्हा वेगळ्या अंदाजात डोळा मारला आहे. गेल्या वर्षी प्रियाने तिच्या स्टाईलने भुवई उडवत सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला होता. मात्र या नवा व्हिडिओ देखील अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये प्रिया पावसात भिजताना दिसत असून तिच्या त्याच जुन्या अंदाजात हावभाव करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला साधारण ९० हजारांहून अधिक वेळा बघितले गेले आहे. गेल्या वर्षी देखील तिच्या व्हिडिओने आणि हावभावांनी सोशल मीडियावर खूप धूमाकूळ घालत ती चर्चेत होती. नुसतेच व्हिडिओच नाही तर तिच्या फोटोतील अदांनी देखील प्रिया नेटकऱ्यांवर भुरळ घालत असते.

View this post on Instagram

Coming soon!

A post shared by Priya Prakash Varrier? (@priya.p.varrier) on

- Advertisement -

गेल्या वर्षीच्या प्रिया प्रकाशच्या ‘विंक और फायर गन’ च्या इशारे आणि हावभावांनी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तिच्या फोटो आणि व्हिडिओने धुमाकूळ घातल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. सध्या प्रियाचे इन्स्टावर ७० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

गेल्या वर्षी या सोशल मीडियावरील व्हिडिओने अनेकांना प्रियाने घातली भुरळ

- Advertisement -