बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा प्रियंकाचे तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रियंका आपल्या कुटुंबासोबत भारतात पोहोचली आहे. भारतात पोहोचल्यानंतर बुधवारी प्रियंकाने आपल्या कुटुंबीयांसोबत अयोध्येतील श्री रामांचे दर्शन घेतले. यादरम्यानचे काही फोटो प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियंकाने घेतलं अयोध्येतील श्री रामांचे दर्शन
View this post on Instagram
प्रियंकाने बुधवारी अयोध्येतील श्री रामांचे दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी मालती मेरी, पती निक जोनस आणि आई देखील होती. यावेळी प्रियंकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर मालती मेरीने देखील सुंदर ट्रेडिशनल ड्रेस घातला होता. तसेच पती निक जोनसने देखील व्हाइट कुर्ता परिधान केला होता. यादरम्यानचे काही फोटो प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून प्रियंकाचा देसी लूक पाहून चाहते खूप कौतुक करत आहेत.
दरम्यान, लग्नानंतर प्रियंका परदेशात स्थायिक झाली असली तरी कामानिमित्त ती अनेकदा भारतात येते. परदेशात राहूनही प्रियंका भारतीय संस्कार विसरली नाही. परदेशातही भारतीय सण प्रियंका साजरे करताना दिसते. तसेच भारतात आल्यानंतरही ती अनेकदा सिद्धिविनायकाचं दर्शन घेते.
‘या’ चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत होती. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत