घरमनोरंजनबॉलिवूड गाण्यावर प्रियांकाच्या मुलीचा डान्स; शेअर केला सुंदर व्हिडीओ

बॉलिवूड गाण्यावर प्रियांकाच्या मुलीचा डान्स; शेअर केला सुंदर व्हिडीओ

Subscribe

प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलीचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची मुलगी मालती एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या मुलीसोबत आनंदाने क्षण घालवताना दिसते. वारंवार या संदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ प्रियांका तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते. परंतु प्रियांकाने आत्तापर्यंत तिच्या मुलीच्या चेहऱ्याचा फोटो शेअर केला नाही. दरम्यान, प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलीचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची मुलगी मालती एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रियांकाचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

प्रियांकाच्या मुलीचा बॉलिवूड गाण्यावर डान्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

- Advertisement -

प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलीचा एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची मुलगी मालती बॉलिवूडमधील ससुराल गेंदा फूल या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये मालतीने गुलाबी रंगाचं सुंदर फ्रॉक घातलं असून त्यावर मॅचिंग हेअरबँड देखील तिच्या केसात लावलेला आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “शनिवारची सकाळ अशी असावी”.

मालतीच्या व्हिडीओवर बॉलिवूड कलाकारांच्या प्रतिक्रिया
प्रियांकाने मालतीचा हा शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. सोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियांका वारंवार सोशल मीडियावर तिच्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते, परंतु आता चाहते तिच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, येत्या काळात प्रियांका चोप्रा अभिनेत्री कतरीना कैफ आणि आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. तसेच ती सध्या हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.


हेही वाचा : मला स्त्री भूमिकेत पाहून माझी मुलगी झाली होती नाराज, पण… नवाजुद्दीन सिद्दीकीचा खुलासा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -