घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमविप्र निवडणूक मतमोजणी LIVE : सगळ्यात पहिली अपडेट

मविप्र निवडणूक मतमोजणी LIVE : सगळ्यात पहिली अपडेट

Subscribe

नाशिक : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्यप्रसारक समाज शिक्षण संस्थेची निवडणूक रविवारी (दी.२८) पार पडली. प्रचाराच्या काळात अतिशय चुरशीची आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीनंतर रविवारी जिल्हयाभरत शांततापूर्ण मतदान पार पडले. त्यानंतर आज (दी.२९) सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या मुख्यालय कॅम्पस परिसरातील मराठा हायस्कूलच्या बाजूला असलेल्या कै. तुकाराम रौदळ सभागृहात ही मतमोजणी पार पडत आहे. सुरवातीला पदाधिकारी जागांसाठीच्या मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत. त्यातून २ फेऱ्याच्या मतपत्रिका बाहेर काढून प्रक्रियेस सुरवात करण्यात आली आहे.  या मतपत्रिकानची रंगानुसार विभागणी करून मंतमोजणीला सुरवात होईल.

- Advertisement -

खरे कल दुपारनंतरच 

मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरवात मात्र खरे कल दुपारी १ वाजेच्या जेवणाच्या सुट्टीनंतरच समोर यायला सुरवात होईल. कारण सर्व मंतपत्रिक एकत्र करायच्या त्यानंतर त्यांची पुन्हा रंगनिहाय विभागणी करायची, त्यानंतर २५ मतांचे गठ्ठे बनवायचे अशी सगळी प्रक्रिया असल्याने खरे कल दुंपारनंतरच समोर येऊ शकतील. 

सेवकांचे निकाल तासाभरात 

सेवकांच्या ३ जागांसाठी सेवक विरुद्ध समर्थ या दोन पॅनल मध्ये थेट सामना होत आहे. रविवारी पडलेल्या मतदानात एकूण ४०९ सेवकांनी मतदान केल आहे. सेवक मतदारांचा आकडा संभासदांच्या तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे सेवक संचालकांच्या जागेसाठीची मतमोजणी अवघ्या तासाभरात पूर्ण होईल.

- Advertisement -

 

दरम्यान, सेवक संचालकांच्या ३ तसेच, पदाधिकारी व संचालक अश्या एकूण २४ जागांवर ही मतदान पार पडले. संचालक मंडळासाठी एकूण ९ हजार ६७७ म्हणजेच ९४.६४ टक्के मतदान झाले तर सेवक संचालकांच्या ३ जागांसाठी ४०९ इतके मतदान झाले. सध्या मतमोजणी प्रक्रियेच्या ठिकाणी परिवर्तन पॅनलचे प्रमुख नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, तर प्रगतीच्या वतीने नीलिमा पवार यांचे सुपुत्र प्रणव पवार, विशाल सोनवणे, बाळासाहेब खताळे आदि उपस्थित आहेत.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -